इस्रायल आणि हमासमधील युद्धाला आता 3 आठवड्यांपेक्षाही जास्त झाले आहेत. पण अद्यापही हे युद्ध थांबण्याची काही चिन्हं दिसत नाही आहेत. इस्रायल लष्कराने हमासविरोधातील आपली कारवाई आक्रमक केली आहे. इस्रायल लष्कर आता धीम्या गतीने गाझामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी आम्ही हमासला पूर्णपणे संपवणार असल्याचा इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यादरम्यान सोशल मीडियावर इस्रायल आणि पॅलेस्टाइन समर्थकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पॅलस्टाइन समर्थकाने मॅकडोनल्डच्या युकेमधील आऊटलेटमध्ये जे केलं ते भीतीदायक आहे. टिकटॉकला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 


या व्हिडीओत पॅलेस्टाइनचा झेंडा डोक्याला बांधलेला एक व्यक्ती नंबर प्लेटच्या जागी Free Palestine असं लिहिलेल्या कारच्या डिक्कीतून मोठा बॉक्स बाहेर काढतो. हा बॉक्स घेऊन तो मॅकडोनल्डच्या आऊटलेटमध्ये घुसतो. येथे अनेक लोक असतात. दरवाजात पोहोचताच तो बॉक्समधील सर्व उंदीर खाली फेकून देतो. इतके उंदीर पाहिल्यानंतर तेथील लोकांची धावपळ सुरु होते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ORION (@laworion)


व्हिडीओच्या शेवटी कथितपणे इस्रायलचं समर्थन करणाऱ्या मॅकडोनल्ड्स, स्टारबक्स आणि डिझ्नी यांच्यावर बंदी घालण्याचं आवाहन केलं जातं. 


महिन्याच्या सुरुवातीला मॅकडोनल्ड इस्रायलने इस्रायली सैनिकांसाठी मोफत जेवण देणार असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर पॅलेस्टाइन समर्थकांनी संताप जाहीर केला होता. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मॅकडोनल्ड्समध्ये उंदीर सोडणारी व्यक्तीही इस्रायलच्या याच घोषणेमुळे संतापलेला होता.