Israel Hamas War : गाझा पट्टीतील (gaza strip) हमास (Hamas) या दहशतवादी संघटनेने क्रूरतेचा कळस गाठला आहे. शनिवारी पहाटे इस्रायलवर (israel vs hamas) केलेल्या 5000 रॉकेटने हल्ल्या केला. त्यानंतर सोशल मीडियावर हमासच्या क्रूर आणि अमानुष कृत्यांचे धक्कादायक व्हिडीओ आणि फोटो समोर येत आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून त्यांनी या युद्धात तरुणी आणि महिलांना लक्ष केलं आहे. हमासकडून या युद्धात बलात्काराला शस्त्र म्हणून उपयोग करण्यात येतो आहे. (Israel Hamas War Hamas seems to have kidnapped mostly women Hamas fighters are using rape as a weapon of war Israel War Room tweet)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हल्ल्यामध्ये असंख्य आणि मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुणींचं अपहरण झाल्याचं समोर आलं आहे.  इस्त्रायल वॉर रुमने याबद्दल भीती व्यक्त केली आहे.  इस्रायल वॉर रुम या स्वयंसेवी संस्थेनं आपल्या अधिकृत अकाऊंटवर हमासच्या हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या तरुणींचे फोटो पोस्ट केले आहेत. हमासकडून शस्त्र म्हणून तरुणींवर बलात्कार करण्यात येतो आहे, अशी भीती इस्त्रायल वॉर रुम व्यक्त केली आहे. यात ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'या रानटी लोकांवर कुठलीही दयामाया दाखवली जाऊ नये.'



युद्धाच्या नावाखाली हमास दहशवादी संघटनेकडून सुरु असलेला क्रूरेचा तमाशा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका महिलेचा धक्कादायक व्हिडीओ जगाची झोप उडवतोय. एका परदेशी तरुणीला ओलीस ठेवून तिला विवस्त्र करण्यात आलं. त्यानंतर तिला अर्धनग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली. संतापजनक म्हणजे काही दहशतवादी त्या तरुणीवर थुंकताना दिसत होते. मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी जर्मनीची असून ती इस्त्रायलमध्ये एका पार्टीसाठी गेली होती. 



दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये एक तरुणी स्वत:ला वाचविण्यासाठी धडपडताना दिसत आहे. या तरुणीला दहशतवादी बाइकवर बसून अपहरण करताना दिसून येत आहे. ही तरुणी बॉयफ्रेंडसोबत एका पार्टीसाठी आली होती. तिच्या कुटुंबियांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 



नोआ अर्गमानी असं या तरुणीचं नाव आहे तर तिच्या बॉयफ्रेंडचं नाव अवी नाथन असं आहे. हमासने अचानक हल्ला केला त्यात तरुणी आणि तिच्या बॉयफ्रेंड पकडल्या गेले. मला मारु नका मला मारु नका अशी विनवणी करताना ती दिसत होती. तर त्याच्या बॉयफ्रेंडला दहशतवाद्यांनी बेदम मारहाण केली होती.