नवी दिल्ली : आज संपूर्ण जगात फ्रेंडशिप डे साजरा झाला. या दिवशी अनेक जण आपल्या मित्राला शुभेच्छा देतो. पण भारताचा जवळचा मित्र असलेल्या इस्राईलने देखील आपल्या मित्राची आठवण काढली आहे. "तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा याराना." गाण्याची ही ओळ ट्विट करुन इस्राईलने भारताला पुन्हा एकदा खरा मित्र असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील इस्राईलच्या दुतावासाने म्हटलं की, "हॅपी फ्रेंडशिप डे २०२० इंडिया, भविष्यकाळात आमची मैत्री आणि वाढती भागीदारी आणखी मजबूत होवो".



पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची मैत्री खास ठरली आहे. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान मोदींचे संबंधही चांगले राहिले आहेत.



सन 2017 मध्ये, बेंजामिन नेतान्याहू जेव्हा भारतात आले तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांचा विशेष पाहुणचार केला होता. पंतप्रधान मोदी जेव्हा इस्त्राईलला गेले तेव्हा नेतान्याहू प्रोटोकॉल तोडून त्यांच्या स्वागतासाठी पोहोचले होते. 2019 मध्ये, बेंजामिन नेतान्याहू यांनी सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदींसोबतची मोठी पोस्टर्स लावली होती. 


अमेरिकन दूतावासानेही अभिनंदन केले. भारतातील अमेरिकन दूतावासानेही फ्रेंडशिप डेबद्दल भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. दूतावासाने ट्विट केले आहे की, 'हॅपी फ्रेंडशिप डे, यूएस इंडिया मैत्री.'