नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच्या जुलै महिन्यात इस्राईलचा ऐतिहासिक दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते. मोदींच्या निमंत्रणानंतर नेतन्याहू जानेवारीमध्ये भारतात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्रायली पंतप्रधानांनी आपल्या संसदेत सांगितले होते की, जानेवारीमध्ये पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणामुळे ते भारताला भेट देणार आहेत.


अद्याप यावर भारताकडून कोणतेही आधिकारिक घोषणा नाही झाली. पण भारत दौऱ्यावर येणारे नेतन्याहू इस्रायलचे दुसरे पंतप्रधान असणार आहेत. यापूर्वी, एरयिल शेरॉन 2003 मध्ये भारतात आले होते.


यावर्षी जुलै महिन्यात पंतप्रधान मोदींनी इस्राईलचा दौरा केला होता. इस्रायलच्या पंतप्रधानांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी विमानतळावर मोदींचे जोरदार स्वागत केले होते.