अनोळखी व्यक्तीशी ऑनलाईन दोस्ती बेतली तिच्या जीवावर
केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली ऑनलाईन दोस्ती ही किती भयंकर असू शकते याचे धक्कादायक उदारहरण पुढे आले आहे. केवळ ऑनलाईन झालेल्या दोस्तीतून अनोळखी व्यक्तीसोबत डेटला जाणे एका तरूणीला चांगलेच महागात पडले. तिच्यावर आपले कान, नाक आणि प्रायव्हेट पार्टही गमावण्याची वेळ आली.
मॉस्को : केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली ऑनलाईन दोस्ती ही किती भयंकर असू शकते याचे धक्कादायक उदारहरण पुढे आले आहे. केवळ ऑनलाईन झालेल्या दोस्तीतून अनोळखी व्यक्तीसोबत डेटला जाणे एका तरूणीला चांगलेच महागात पडले. तिच्यावर आपले कान, नाक आणि प्रायव्हेट पार्टही गमावण्याची वेळ आली.
ही घटना आहे रशियातील. त्या दोघांची त्यापूर्वी कधीच भेट झाली नव्हती. जी झाली ती सोशल मीडियातून. भेट व्हावे असे कारणही नव्हते. तामारा (वय ४१) असे नाव असलेली ती एक नर्स होती. तर, अनातोली येजुकोव (45) नावाचा तो फारसा काही कामधंदा करत नव्हता. सतत ऑनलाईन राहणारे ते दोघे. एकमेकांचे मित्र कधी झाले आणि त्यांच्या मैत्रीचे नाते अतिसलगीत कधी झाले, हे दोघांनाही कळले नाही. कदाचीत त्याला कळले असावे. पण, तिला याची सुतराम कल्पना नसावी.
दोघांमधील प्रेम दिवसेंदिवस अधिक पूढचा टप्पा गाठत होते. .... आणि अखेर तो दिवस उजाडला. दोघांनी डेटवर जायचे ठरवले. त्याच्यावर विश्वास ठेऊन तीही डेटला तयार झाली. आणि त्या भयंकर प्रकाराला तिला सामोरे जावे लागले.
स्थानिक पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने तीला होस्टेलच्या रूमवर बोलवले. ती येणार म्हणून त्याने त्या रात्री खाण्या पीण्याची (ड्रिंक्स) पूर्ण तयारी केली होती. दोघांनी मिळून खाणेपीणे केले. अचानक त्याने विचीत्र वर्तन करण्यास सुरूवात केली. तो तीला मारहाण करू लागला.
विकृतीने पेटून उटलेल्या त्याची हैवानी इतक्यावरच थांबली नाही. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, त्याने आपल्या दातांनी तिचे कान, डोळे आणि ओठ खाण्यास सुरूवात केली. इतके की, तिच्या शरीराच्या प्रायव्हेट पार्टवरही त्याने दातांनी हल्ला चढवला. तो तिच्या शरीराचे लचके तोडू लागला. पण, तिचे नशीब थोर होते.
... त्याच्यापासून सूटण्याची ती केविलवाणा प्रयत्न करत होती. जोरजोरात ओरडत होती. मदतीची याचना करत होती. अखेर शेजाऱ्यांनी तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. शेजाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. तसेच, त्या खोलीचा दरवाजा तोडून त्यांनी आत प्रवेश केला. तोपर्यंत ती अधिक प्रमाणात जखमी झाली होती. पण तिचा जीव वाचला होता.
पोलिसांनी आरोपी अनातोलीला जागेवरच अटक केली. सध्या तो तुरूंगात आहे. तर, तामारावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अतीमहत्त्वाचे
ही घटना वाचल्यावर ऑनलाईन दोस्ती सुरक्षीत नाही हेच पुढे येते. त्यामुळे तरूण, तरूणींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन दोस्ती करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्य़था चेहरा नसलेली ती बेभरवशाची दोस्ती तुमच्या जीवावर बेतू शकते.