Poveglia Island : इमरती या सिमेंट, रेती, विटा, दगड माती यापासून बनलेल्या असतात. पण, मनुष्याच्या  मृतदेहांच्या राखेपासून इमारत बनवली आहे असं कुणी तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र, जगात एक अशी इमारत आहे जी तब्बल 160000 मृतदेहांच्या राखेपासून बनवलेली आहे. ही इमारत जिथे आहे ते ठिकाण पृथ्वीवरील सर्वात भयानक ठिकाण मानले जाते.  एका ठिकाण म्हणजे एक निर्मनुष्य बेट आहे. एके काही हे बेट जगातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ होते. मात्र, इथ असं काय भयानक घडलं.   


हे देखील वाचा... भविष्यवाणीने जगाला धडकी भरवणाऱ्या बाब वेंगाचे खरं सत्य कुणालच माहित नाही? आयुष्य म्हणजे मोठ रहस्य  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वीवरील सर्वात भयानक ठिकाण  इटलीमध्ये आहे. इटली हा जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे. मात्र, येथे असलेले 'पोवेग्लिया आयलंड'ला जगातील सर्वात भयानक बेट म्हणून ओळखले जाते. या बेटाला 'मृत्यूचे बेट' असेही नाव देण्यात आले आहे.  55 वर्षे निर्जन राहिलेल्या पोवेग्लिया बेटाचा इतिहास अगदी 9व्या शतकापासूनचा आहे. 


असे सांगितले जाते की एकेकाळी हे बेट खूप सुंदर होते, परंतु एका अनपेक्षित घटनेने त्याचा संपूर्ण इतिहास बदलून टाकला.  1776 मध्ये, या बेटाचा वापर व्हेनिसला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी चेक पॉइंट म्हणून केला जात होता. दरम्यान बंदरात येणाऱ्या दोन जहाजांमध्ये प्लेगच्या अनेक रुग्ण आढळून आले. अशा परिस्थितीत, पोवेग्लियाचा वापर 1793-1814 पासून क्वारंटाइन स्टेशन म्हणून केला जाऊ लागला. ज्याला प्लेगची लक्षणे दिसली त्याला लाथ मारून बेटावर ओढले जात असे सांगितले जाते. जेव्हा हा रोग पसरला आणि कोणताही इलाज सापडला नाही तेव्हा सर्व 160,000 लोकांना येथे जिवंत जाळले गेले. वृत्तानुसार, मृतांमध्ये दीड लाखांहून अधिक लोक होते.


सन 1922 मध्ये येथील इमारतीत मनोरुग्णांना ठेवण्यात आले. इथल्या डॉक्टरांनी 1930 पर्यंत रुग्णांवर क्रूड लोबोटॉमीचा प्रयोग केले. त्यासाठी त्याने अनेक रुग्णांवर अत्याचार करून त्यांची हत्या केली. यासाठी वापरलेली साधने आजही येथे पहायला मिळतात. मृत लोकांचे आत्मे येथे फिरत होते असेही सांगितले जोते. डॉक्टरला याचा त्रास होता. याच त्रासाला कंटाळून  डॉक्टरने बेटावरील बेल टॉवरवरून उडी मारून आत्महत्या केली असे देखील सांगितले जाते.  पोवेग्लिया बेटाचा 50 टक्के भाग अंत्यसंस्कारातील मानवी राखेपासून बनलेला आहे. हे ठिकाण सध्या पृथ्वीवरील सर्वात भितीदायक ठिकाण बनले आहे. येथे रात्रीच्या वेळेस ओरडण्याचे आवाज येतात.