मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवा, संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव
भारताच्या परराष्ट्र धोरणाला यश मिळण्याची चिन्हं
नवी दिल्ली : जैश- ए- मोहम्मद Jaish e Mohammed या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर masood azhar याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. संयुक्त राष्ट्रात याविषयीच्या प्रस्तावाला एकमताने मंजूरी मिळण्याची चिन्हं सध्या पाहायला मिळत आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास तो भारतीय परराष्ट्र धोरणाचा विजय असेल असं म्हटलं जात आहे. pulwama attack पुलवामा हल्ल्य़ानंतर अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्य़ात यावं यासाठीच्या हालचालींना वेग आला होता. फक्त पुलवामाच नव्हे तर, पठाणकोटसोबतच इतरही काही मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप अझहरवर आहे. ज्या धर्तीवर आता हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या राष्ट्रांनी पुन्हा एकदा अझहरच्या नावाचा समावेश आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत करावा याविषयीचा प्रस्ताव ठेवला आहे. ज्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी मिळाल्यास अझहरवर कारवाई करणं सोपं झाल्याची चित्र स्पष्ट होत आहेत. काळ्या यादीत गेल्यामुळे आता पाकिस्तानकडून अझहरला मिळणारी आर्थिक रसद थांबवावी लागेल. त्यामुळे ही पाकिस्तान आणि खुद्द अझहरचीच कोंडी होणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी घेतलेली ही भूमिका पाहचा जैशच्या म्होरक्या म्हणून दहशवादाच्या क्रूर कारवायांचे कट रचणारा अझहर अखेर साऱ्या जगाच्याच निशाण्यावर आला आहे.
युक्त राष्ट्रांमध्ये याआधीही वारंवार भारताकडून मसूद अझहरचं नाव आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करत त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं अशी मागणी भारताकडूनन करण्यात आली होती. पण, त्यावेळी सिक्युरिटी काऊन्सिलवर असणाऱ्या चीनने हा प्रस्ताव नाकारला होता. २००९ आणि २०१६ मध्ये भारतानं याबाबत प्रस्ताव मांडला होता. २०१६ साली पी-थ्री म्हणजे अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांकडून प्रस्तावाला अनुमोदन होतं. त्यानंतर २०१७ साली पी-थ्री देशांनी पुन्हा अशाच आशयाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडे सादर केला होता. पण, या तिन्ही वेळा चीननं आपला नकाराधिकार वापरूत अझहरला वाचवलं होतं.