Capture Supernova: आता बातमी आहे नासाची. माणसाचा अवकाशातील तिसरा डोळा जगातील सर्वात मोठी दुर्बीणने जगभरातील शास्त्रज्ञांना पुन्हा एकदा आश्चर्यचकित केलं आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने पहिला सुपरनोवाची नोंद केली आहे. या रोचक अनुभवाने अवकाश विज्ञान क्षेत्रात संशोधनाचे नवे क्षेत्र खुले झाल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. अवकाशातील अनेक रहस्यमय गोष्टी या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने उघडता येत आहे. सुरुवातीच्या दिवसात या तिसऱ्या डोळ्यातून पृथ्वीवरील 3-4 अब्ज प्रकाश-वर्षे दूर एक अनपेक्षित तेजस्वी प्रकाश कैद झाला आहे. या प्रकाशाच्या फोटोतून जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडलं आहे. 


'सुपरनोवा'चं थेट प्रक्षेपण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेली मेल मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, जेम्स हबलसोबत काम करणाऱ्या टीमने SDSS.J141930.11+5251593मध्ये प्रकाश गॅलेक्सी पाहिला. या फोटोच्या संशोधनातून अनेक रहस्य समोर आलं आहे. हा तेजस्वी प्रकाश 5 दिवसांमध्ये हळूहळू मंद होत गेला. त्यावरुन शास्त्रज्ञांच्या मते हा सुपरनोवा आहे. सुपरनोवाचं स्फोट होतानाचा प्रसंग जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने कैद केला आहे. या प्रकाशाची पुष्टी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी याची तुलाना संग्रहित डेटाशी केली. या रिसर्चनंतर हा एक आश्चर्यकारक शोध असल्याचं बोलं जात आहे. 


खगोलशास्त्रज्ञांनी यावर सांगितलं आहे की, ''आम्ही जेम्स हबरला सुपरनोवा शोधण्यासाठी अवकाशात पाठवलेले नाही. मात्र तरीही या दुर्बीणने सुपरनोवा हे अद्भूत क्षण कॅमेऱ्यात टीपलं आहे. हे नासासाठी मोठ्या यशापेक्षा कमी नाही.''


काय आहे सुपरनोवा?


मरत्या ताऱ्याचा स्फोट म्हणजे सुपरनोवा. जेव्हा जेव्हा ताऱ्याची ऊर्जा संपते तेव्हा त्या ताऱ्याचा स्फोट होतो. सुपरनोवाचे थेट प्रेक्षपण पाहणे हे जेम्स वेबचं मोठं यश आहे. विज्ञानाने एवढी प्रगती केली असली तर आजही सुपरनोवा शोधणे खूप अवघड काम आहे. कारण सुपरनोवाचा स्फोट हा खूप कमी सेकंदाचा असतो. या स्फोटानंतर धूळ आणि वायू देखील काही दिवसात हळूहळू नाहीसे होतात. अशावेळी या तिसऱ्या डोळ्याने योग्य वेळी योग्य दिशेला पाहणे गरजेचं आहे. त्यामुळे या दुर्बीणने घेतलेले हे फोटो म्हणजे नासासाठी खूप मोठं यश मानावं लागेल.