टोकीयो/वॉशिंग्टन : जपानला मिळालेल्या रेडिओ सिग्नलमुळे उ. कोरिया पुन्हा एकदा बॅलिस्टिक क्षेपणात्राची चाचणीची तयारी करत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


सिग्नल अनपेक्षित नाहीत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र अशा प्रकारचे सिग्नल अनपेक्षित नसून उपग्रहाकडून मिळालेल्या छायाचित्रावरून नवीन घडामोडी घडत असल्याचं दिसत नाही, असं जपान सरकारच्या सूत्रांनी म्हटलयं. 


संप्टेंबरमध्ये सोडलं होतं रॉकेट


संप्टेबरमध्ये उ. कोरियाने जपानच्या होकैडो बेटावरून रॉकेट सोडलं होतं. सध्या मिळालेल्या सिग्नलमुळे जपान सावध झालं असून येत्या काही दिवसांत क्षेपणात्राची होण्याची शक्यता आहे. उ. कोरिया लष्काराच्या हिवाळी प्रशिक्षणाची तयारी करत असण्याची एक शक्यता आहे. 


गुप्तहेर खात्यांचं बारीक लक्ष


अमेरिका, द. कोरिया आणि जपानच्या गुप्तहेर खात्यांना क्षेपणात्राची चाचणीच्या माहितीमुळे तिन्ही राष्ट्रं सावध झाली आहेत. अमेरिकेचं उ. कोरियावर बारीक लक्ष असल्याचं वक्तव्य पेंटागॉनच्या प्रवक्त्याने केलयं. तसंच द. कोरिया आणि अमेरिकेची युती उ. कोरियाच्या हल्ल्यांना तोंड देण्यास समर्थ असल्याचं त्यांनी सांगितलयं.