Japan Moon Mission : तब्बल 5 महिन्यानंतर जापानच्या स्मार्ट लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले.  चंद्रावर यशस्वी लँंडिंग करुनही जपानचे मून मिशन अयशस्वी झाले आहे. जापानच्या स्मार्ट लँडरने   पृथ्वीवर डेटा पाठवण्याआधीच मोठा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. यानाशी संपर्क साधताना अडचण येत असल्याची माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लँडरच्या बॅटरीत तांत्रिक बिघाड


लँडरवर बसवण्यात आलेल्या सोलर पॉवर सेलमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. सोलर पॉवर पावर सप्लाय निर्माण करण्यास अकार्यक्षम ठरत आहे. सध्या हा लँडर बॅटरी मोडवर काम करत आहे. सोलर पॅनलच्या मदतीने बॅटरी चार्ज न झाल्यास पॉवर सप्लाय बंद होईल. यानंतर लँडरशी संपर्क साधता येणार नाही. पुरेसा सुर्यप्रकाश पडत नसल्याने सोलर पॅनल चार्ज होत नसल्याची माहिती समोर येत आहेत. हे यान चंद्राच्या शिओली क्रेटर जागेवर उतरले आहे. शिओली क्रेटर या जागे जागेला Mare Nectaris असेही म्हणातात. हा प्रदेश चंद्राचा समुद्र म्हणून ओळखला जातो. चंद्रावरील या जागेत खूप गडद अंधार असतो.  मून मिशनवर काम करणारी टीम हा तांत्रिक अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. सोलर पॅनलला पुरेशा सूर्य प्रकाश मिळावा यासाठी त्याची दिशा बदलली जाणार आहे. 6 सप्टेंबर रोजी जपानचे हे यान चंद्राकडे झेपावले. 25 डिसेंबर रोजी ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले. लँडिंगपूर्वी अनेक आठवडे लँडरच्या सिस्टमची सातत्याने चाचणी केली जात होती.


07 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी H-IIA रॉकेटद्वारे जपानच्या या यानाचे प्रक्षेपण झाले. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून हे यान चंद्राकडे झेपावले. 19 जानेवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड झाले आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा निश्चित केली होती. या यानाने अचूक लँंडिग केले असून निश्चित जागेवरच हे यान लँड झाले.  हे यान सुनिश्चित केलेल्या जागेवरच लँड झाले आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने लँडिंगसाठी 600x4000 किमी जागा निवडली होती. या जागेत 100 मीटरच्या आतच या यानाने अचूक लँडिंग केले आहे.


याआधी भारत, रशिया, अमेरिका आणि चीनचे यान चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहेत. जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. XRISM च्या मदतीने चंद्रावर वाहणाऱ्या प्लाज्मा लहरींचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे ब्रम्हांडात ताऱ्यांची निर्मिती कशी झाली. तसेच आकाशगंगा याचा अभ्यास हे यान करणार आहे.