Bullet Train To Moon Japan : सध्या चीन, जपान, युरोप, अमेरिका या देशांमध्ये बुलेट ट्रेन धावत आहे आहेत. मात्र, आता थेट चंद्रावर बुलेट ट्रेन धावणार आहे. जपानची चंद्रावर बुलेट ट्रेन नेण्याची तयारी आहे. जपाननं पथ्वीवरुन थेट चंद्र आणि मंगळावर बुलेट ट्रेन पाठवण्याची योजना आखली आहे. भविष्यात चंद्रावर मानवी वसाहत निर्माण करण्याचे संशोधकांचे स्वप्न आहे. यामुळे फक्त बुलेट ट्रेनच नाही तर चंद्रावर राहायचं कसं, खायचं काय याचा प्लॅनही रेडी आहे.


चंद्रावर धावणार  'स्पेस एक्स्प्रेस' बुलेट ट्रेन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिथे सर्वसामान्यांची कल्पना संपते. तिथे जपानी तंत्रज्ञांचं संशोधन सुरू होतं. आता चक्क चंद्र आणि मंगळावर बुलेट ट्रेन नेण्याची मोहीम जपाननं हाती घेतलीये.  या बुलेट ट्रेनचं नाव 'स्पेस एक्स्प्रेस' असं ठेवण्यात आलंय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानावर आधारित रेडियल सेंट्रल अॅक्सिस असेल. या व्हर्च्युअल रुळांवरून ट्रेन चंद्र आणि मंगळापर्यंत प्रवास करेल.  6 डब्यांच्या या गाडीमध्ये सुरूवातीला आणि शेवटी रॉकेट बुस्टर बसवलेले असतील. ट्रेन पुढे आणि मागे नेण्यासाठी त्याचा वापर केला जाईल.  पृथ्वीवरून चंद्र आणि मंगळाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून ही ट्रेन प्रवास करणार आहे.  विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये 1 G, म्हणजे पृथ्वीइतकं गुरूत्वाकर्षण कायम राखलं जाईल.


चंद्रावर  पृथ्वीसारखंच वातावरण असलेल्या वसाहतीही उभारणार  


या प्रकल्पासाठी क्योटो विद्यापीठ आणि काजिमा कंस्ट्रक्शन कंपनीनं काम सुरू केलंय. पण केवळ चंद्र आणि मंगळावर जाऊन परत यायचं नाही. तिथे राहायचीही तयारी जपाननं सुरू केलीये. त्यासाठी पृथ्वीसारखंच वातावरण असलेल्या वसाहतीही उभारल्या जाणार आहेत.   चंद्र आणि मंगळाच्या पृष्ठभागावर जाड काचेच्या आत या वसाहती असतील. चंद्रावरील वसाहतीला लूनाग्लास आणि मंगळावरील वस्तीला मार्सग्लास असं नाव देण्यात येणार आहे. 
या वसाहतींमध्ये पृथ्वीसारखंच वातावरण, कृत्रिम गुरूत्वाकर्षण असेल.  आतमध्ये हिरवी झाडं, नद्या, तलाव इत्यादी सगळं काही असेल.  कॉलनीमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही देण्यात येईल.