टोकिओ : जपानमध्ये १५९ तासांचा ओव्हरटाइम केल्यानंतर एका महिला पत्रकाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मिवा सादो असे त्यांचे नाव असून नॅशनल ब्रॉडकास्टरमध्ये त्या राजकिय पत्रकार म्हणून कार्यरत होत्या. 


हृदयविकाराच्या झटक्यांमुळे जुलै २०१३ मध्ये त्यांचे निधन झाले होते. तथापि, त्यांच्या एका कर्मचाऱ्याने मिवा यांच्या मृत्यूची फाईल रिओपन केली. कामगार पोलिसांनी केलेल्या तपासात मिवा यांचा मृत्यू हा ओव्हरटाईम केल्याने झाल्याचे सांगितले आहे.
जपान टाईम्सच्या अहवालात अधिकाऱ्यांनी म्हटले की, ३१ वर्षीय मिवांचा मृत्यू जास्त काम केल्यानेच झाला आहे.
३० दिवसांत तिने फक्त दोन दिवसांची सुट्टी घेतली होती. द इंडिपेंडंटच्या अहवालाच्यानुसार, जपानच्या नॅशनल ब्रॉडकास्टर एनएचकेसाठी टोकियो मेट्रोपोलिअन कव्हर करणारी महिला पत्रकार होती. इलेक्शन रिपोर्टिंगच्या ३ दिवसानंतर तिचा मृत्यू झाला.  ब्रॉडकास्टरच्या एका वरिष्ठाने सांगितले की,हा मृत्यू आमच्यासाठी धक्कादायक आहे.