टोकियो : अत्याधुनिक जगात संवेदना बोथट होत चालल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. घटना आहे जपानमधील काबुकिचो रेड-लाईट परिसरातील. येथील एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या नवजात स्त्री अर्भकाची हत्या करून त्याचा मृतदेह कंपनीच्या लॉकरमध्ये लपविला. ही महिला २५ वर्षांची असून, तिचे नाव माओ तोगवा असे आहे.


सूटकेसमध्ये नवजात अर्भकाचे शव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवजात अर्भकाचे शव चादरीमध्ये लपेटून सूटकेसमध्ये ठेवण्यात आला होता. ही सूटकेस कंपवनीच्या लॉकरमध्ये लपवली होती. एका सफाई कर्मचाऱ्याने सफाई करण्यासाठी लॉकर उघडताच लॉकरमधून दूर्गंधी आली. दूर्गंधीचे कारण शोधताना ही सूटकेस हाती लागली. सूटकेस उघडून पाहिली असता त्यात नवजात अर्भकाचे शव मिळाले. अर्भक स्त्रीजातीचे होते.


कापडाने गळा आवळून अर्भकाची हत्या


टोकियो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माओ तोगवा ही महिला ज्या कंपनीत काम करत होती त्या कंपनीच्या कॅफेमध्ये तीने १३ जानेवारीला एका बाळाला जन्म दिला. बाळाच्या रडण्याचा आवाज कोणाला येऊ नये यासाठी तिने अर्भकाचा गळा कापडाने अवळला आणि त्याची हत्या केली. त्यानंतर तीने अर्भकाचे शव एका चादरीत गुंडाळून सूटकेसमध्ये ठेवले आणि ती सूटकेस लॉकरमध्ये लपवली. हे लॉकर कंपनी परिसरात कार्यालयापासून साधारण २०० मिटर अंतरावर होते. पोलिसांनी माओ तोगवा हिच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.