Japanese Youth Free Noodles: एक अग्रगण्य जापानी रेमन चेन रेस्टॉरंट निवडणुकीपूर्वी तरुणांना मोफत नूडल्स देत आहे. इप्पुडो नावाचे हे फूड चेन रेस्टॉरंट देशभरात 50 रेमन दुकाने चालवते. फूड चेनच्या मैनीची शिंबुनने सांगितले की, त्यांना मतदान केल्याचे पुरावे दाखवावे लागतील. तरुण जापानी लोक तक्रार करतात की, राजकारण्यांना देशातील बहुसंख्य वृद्ध मतदारांना आवाहन करण्यात अधिक रस असतो आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तरुण खासदारांची संख्या कमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, तोहोकू विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक हिरोशी योशिदा यांनी सांगितले की, राजकारणी वृद्ध मतांकडे डोळा ठेवून असतात. त्यांच्यामुळे निवडणूक जिंकता येते. दुसरीकडे, तरुण लोक अधूनमधून मतदान करतात, म्हणून त्यांना महत्त्व नसतं. म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य दिलं जातं.


जपानची सत्ताधारी पक्ष 10 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत विजयासाठी सज्ज आहे. पंतप्रधान फुमियो किशिदा यांचा सत्ताधारी पक्षाचा जागा वाढतील, असं मत सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. एकूण 125 जागा लढवल्या जात असून, त्यापैकी 63 जागांवर बहुमत मिळेल असा अंदाज आहे. निक्केई बिझनेस डेली पोलनुसार, किशिदाचा लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी स्वबळावर जवळपास 60 जागा जिंकेल असा अंदाज आहे.