Dream Job Offer But Nobody Wants It: नोकरी करणारा प्रत्येक कर्मचारी त्याच्या ड्रिम जॉबच्या (Dream Job) शोधात असतो. या ड्रिम जॉबमध्ये (Dream Job) त्याला गलेलठ्ठ पगार, विकेंडला सुट्टया आणि कामाचा ताण कमी अशा सर्व गोष्टी हव्या असतात. या शोधात तो नेहमीच असतो. आता असाच ड्रिम जॉब एक कंपनी घेऊन आली आहे. ही कंपनी 1 कोटीचा पगार, 2 वर्षाची जॉब सिक्यूरीटी देत आहे. ही ऑफर (Company Offer) एकूण अनेकांना आनंद झाला असेल आणि अर्ज करण्याची घाई लागली असेल. मात्र तरीही या कंपनीत कोणीच अर्ज करत नाही आहे. कर्मचारी या कंपनीत नेमका का अर्ज करत नाहीयेत, हे जाणून घेऊयात.  


नोकरीची ऑफर काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक कर्मचारी अशा नोकरीच्या शोधात असतो, ज्यामध्ये त्याला मोठं पॅकेज (Package) आणि जॉब सिक्यूरीटी (Job Security) मिळावी.आपल्यापैकी बरेच जण अशा नोकरीच्या शोधात असतात.अशीच नोकरी आता कर्मचाऱ्यांसाठी चालून आली आहे. ही कंपनी 1 कोटींचे पॅकेज देतेय आणि 2 वर्षांची जॉब सिक्युरिटी देखील आहे. ज्यांना चांगला पगार आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सुट्टी हवी आहे त्यांच्यासाठी हा ड्रिम जॉबपेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत इतक्या चांगल्या ऑफरनंतर नोकरीसाठी कोणी अर्ज का करत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे काम काय आहे ते प्रथम जाणून घेऊया.


कंपनीच्या जाहिरातीत काय? 


स्कॉटलंडमधील एबरडीनच्या किनार्‍याजवळील उत्तर समुद्रात असलेल्या रिगरसाठी ही नोकरीची ऑफर (Dream Job) आहे.जेथे विहिरी खोदणे, तेल व वायू उत्खनन करण्याचे काम केले जाते. कंपनीच्या जाहिरातीनुसार, या नोकरीसाठी तुम्हाला सहा महिने सतत काम करावे लागणार आहे. यामध्ये एका आठवड्याची आजारपणाची रजाही दिली जाणार आहे. पण कामाची शिफ्ट 12 तासांची असणार आहे. या कामाच्या मोबदल्यात कंपनी दररोज तुम्हाला 36 हजार रुपये देत आहे. जर तुम्ही दोन वर्षांसाठी 6-6 महिन्यांच्या दोन्ही शिफ्ट पूर्ण केल्या तर तुमचा पगार 95,420 पौंड म्हणजेच सुमारे 1 कोटी रुपये होईल.


कंपनीने निवडलेल्या कर्मचाऱ्याला साइटवर मेकॅनिक म्हणून काम करावे लागेल, ज्याचे काम रिगमधून तेल आणि वायू काढणे असणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला किती आणि किती काळ काम करायचे आहे, ही त्याची स्वतःची निवड असणार आहे. 


कर्मचाऱ्यांनी ऑफर नाकारली?


इतका गलेलठ्ठ पगार आणि जॉब सिक्यूरीटी असून देखील कंपनीला कर्मचारी न मिळण्याचे खरे कारण म्हणजे अर्जदाराला प्रमाणित सुरक्षा आणि तांत्रिक प्रशिक्षण आवश्यक आहे. त्याचबरोबर जाहिरातीच्या अटीनुसार कामगाराला सहा महिने रिगमध्ये काढावे लागणार आहेत. यामुळेच या पदासाठी अर्जही मिळू शकले नाहीत.


दरम्यान या कंपनीची जाहिरात आणि कर्मचाऱ्याला मिळणार पगार पाहून नागरीक अवाक झाले आहे. या कंपनीच्या ऑफरची कर्मचारी वर्गामध्ये चर्चा आहे.