Job News : नोकरीच्या ठिकाणी आठवड्याभरामध्ये तुम्ही अमुक तास काम करणं अपेक्षित असल्याचा उल्लेख अनेदा नोकरीवर रुजू होताना हाती दिल्या जाणाऱ्या Appointment Letter मध्ये केलेला असतो. अनेकदा कर्मचाऱ्यांना (Employees) मिळणाऱ्या या हक्कांचं उल्लंघन संस्थांकडूनच करण्यात येतं. जिथं कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या सुट्ट्या नाकारत त्यांच्यावर कामाचा वाजवीपेक्षा जास्त भार लादला जातो. पण, काही संस्था किंबहुना काही देश मात्र या विचारसणीलाच शह देताना दिसत आहेत. ज्यामुळं बहुचर्चित असा चार आठवड्यांचा कार्यालयीन आठवडा लागू करण्याता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 


कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार दिवसांचं काम आणि तीन दिवसांची सुट्टी (Holidays), म्हणजे क्या बात! अशा विचारानं तुम्हीही हुरळून गेलात ना? खरंतच ही आनंदाचीच बाब आहे, पण भारतासाठी नव्हे. कारण, हे नवं सूत्र लागू झालं आहे जर्मनीमध्ये. कोरोना काळानंतर जिथं अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना Work From Home ची सुविधा देणं बंद करत नोकरीवर रुजू होण्याचे आदेश दिले असतानाच जर्मनी मात्र कर्मचाऱ्यांच्याच दृष्टीनं विचार करताना दिसत आहे. 


हेसुद्धा वाचा : Maratha Reservation Survey : गंभीर! मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना मारहाण; कुठं घडली ही धक्कादायक घटना? 


फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून अर्थात 1 फेब्रुवारी 2024 पासून पुढच्या सहा महिन्यांसाठी प्राथमिक टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर जर्मनीमध्ये 4 दिवसांचा कार्यालयीन आठवडा लागू करण्यात येणार आहे. निपुण कर्मचाऱ्यांचा अभाव, आर्थिक मंदी आणि तत्सम आर्थिक आव्हानांचा सामना करणाऱ्या या राष्ट्राकडून सध्या 4 दिवसांचा कार्यालयीन आठवडा लागू करत कर्मचाऱ्यांच्या सुदृढतेसह त्यांच्या समाधानाकडे, आनंदाकडे लक्ष देत आणि त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीनं भर देण्यासाठी म्हणून तेथील कामगार संघटनांच्या सल्ल्यानंतर हे नवं सूत्र लागू करण्यात आलं आहे. 


न्यूझीलंडमध्ये या सूत्राची यशस्वी चाचणी झाल्यानंतर आता जर्मनीनंही याच देशाच्या पावलावर पावलं टाकल्यां पाहायला मिळत आहे.  Federal Institute for Occupational Safety and Health च्या माहितीनुसार 2022 या वर्षात जर्मनीमध्ये कर्मचारी सरासरी 21.3 दिवस काम करण्यातही असमर्थ ठरत होते. ज्यामुळं साधारण 207 बिलियन सुरो म्हणजे भारतीय चलनानुसार 1,86,55,87,26,60,900 रुपयांचं नुकसान झालं होतं. दरम्यानच्या काळात कामाप्रतीची ओढ कमी झालेल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमताही खालावली होती. ज्यामुळं 2023 मध्ये €8.1 trillion चं नुकसान झाल्याचं वृत्त ब्लूमबर्गनं प्रसिद्ध केलं. 


इथं जर्मनीतील 45 कंपन्यांमध्ये 1 फेब्रुवारीपासून 4 दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी केली जाईल. ज्यामुळं कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण यामुळे कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा देशातील कर्मचारी संघटनांनी केलाय. याआधी ब्रिटनमध्येही अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा लागू केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे कामाचा कालावधी कमी केला असला तरीही कोणत्याही संस्थेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनात मात्र कपात करण्यात आली नसल्यामुळं मोठा दिलासा मिळतोय ही वस्तुस्थिती.