विमानात जाताना शिडीवर तीन वेळा पडले जो बायडेन, आरोग्याचा प्रश्न उपस्थित
‘एअरफोर्स वन’ची शिडी चढताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) तीन वेळा पडले. त्यांचा हा पडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
वॉशिंग्टन : ‘एअरफोर्स वन’ची शिडी चढताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) तीन वेळा पडले. त्यांचा हा पडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एअरफोर्स वन या विशेष विमानाची शिडी चढताना तीन वेळेस पडल्यावरही बायडन यांनी स्वतःला सावरले आणि सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. जो बायडन शुक्रवारी आशियाई-अमेरिकी समुदायाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी अटलांटाच्या दौऱ्यावर निघाले होते. अटलांटा जाण्यासाठी ते ‘एअरफोर्स वन’ या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या विशेष विमानाची शिडी चढताना पायऱ्यांवरच पडले. (Joe Biden fell three times while climbing the stairs of Plane)
दरम्यान, या घटनेनंतर त्यांच्या आरोग्याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन पूर्णपणे तंदुरुस्त आहेत का? हा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून उपस्थित करण्यात आला आहे. बायडेन हे विमानाच्या शिडीच्या पायऱ्या चढताना अडखळताना दिसत आहेत. व्हिडिओतमध्ये ते तीन वेळा पडल्याचे दिसून येत आहे. त्यांना कोणतीही इजा झाली नाही ही विशेष बाब आहे.
तीन वेळा घसरण झाल्यानंतरही त्यानी स्वत:ला सावरले आणि ते विमानात जाऊन बसले. त्यानंतर विमानाने उड्डाण घेत आपल्या नियोजित दौऱ्यावर गेले. दरम्यान, व्हाईट हाऊसने जो बायडेन यांच्या या घटनेला जोरदार वारा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. जो बायडेन हे आशियाई-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांशी भेट घेणार आहेत. 'द सन' च्या वृत्तानुसार, जेव्हा अटलांटाला जाण्यासाठी त्याने एअर फोर्स वन विमानात चढण्यासाठी पायऱ्या चढण्यास सुरवात केली, तेव्हा त्याचा तोल गेला आणि ते पायर्यावर पडले. बायडेन यांच्याबाबत ही घटना एकदाच नव्हे तर तीन वेळा घडली. त्यामुळे त्याच्या आरोग्यावर प्रश्न उपस्थित होत होता.