सत्ता संभाळण्याआधी जखमी झाले जो बायडन, झालंय असं काही
आपल्या पाळीव कुत्र्यासोबत खेळत असताना ते खाली पडले आणि फ्रॅक्चर झाले.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन सत्ता संभाळण्याआधी जखमी झाले आहेत. आपल्या पाळीव कुत्र्यासोबत खेळत असताना ते खाली पडले आणि फ्रॅक्चर झाले. बायडन हे जानेवारीला राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. अपघातानंतर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांनी बायडेन यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डाव्या पायाच्या हाडात क्रॅक
जो बायडेन आपल्या कुत्र्यासोबत खेळत असताना पडले. त्यांच्या डाव्या पायाच्या हाडामध्ये क्रॅक आलाय. त्यामुळे ते पुढचे काही दिवस मदतीशिवाय चालू शकत नाहीत. बायडन यांचा पाय मुरगळला. त्यामुळे एक्सरेत हे दिसलं नसल्याचे त्यांचे पर्सनल चिकित्सक केविन ओ कॉर्नर (Kevin O'Brien)यांनी सांगितले. पण डाव्या पायाच्या हाडात क्रॅक आल्याचा खुलासा सीटी स्कॅन अहवालातून झाला.
जो बायडन हे जर्मन शेफड जातीच्या (German Shepard) कुत्र्याचे 'मेजर' मालक आहेत. त्यांच्याकडे असे दोन कुत्रे आहेत. दरम्यान राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजयानंतर जो बायडन आता २० जानेवारीला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतील. त्यांनी आपल्या मंत्र्यांची निवड सुरु केली आहे.