वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत एक दुर्घटना घडली. शनिवारी सकाळी सायकलिंग करताना ते पडले. डेलावेयर इथे ते सायकलिंग करत असताना हा प्रकार घडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायकलिंग करून आल्यावर ते अचानक खाली कोसळले. नक्की काय घडलं हे दोन सेकंद कोणालाच कळलं नाही. त्यांना सावरण्यासाठी लोक पुढे आले. त्यांची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


व्हाईट हाऊस पूल रिपोर्टमधील व्हिडिओमध्ये 79 वर्षीय अध्यक्ष पडल्यानंतर लगेच उठताना दिसत आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन शनिवारी त्यांच्या डेलावेअरमधील बीच हाऊसजवळील केप हेन्लोपेन स्टेट पार्कजवळ त्यांच्या सायकलवरून उतरण्याचा प्रयत्न करत असताना कोसळले.  


या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन स्माइल देऊन मी ठिक आहे असं म्हणाले. माझा पाय अडकल्याने मी खाली पडलो असं ते म्हणाले. जो बायडन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला आहे.