जो बायडेन यांनी Live टीव्हीवर कोरोना लस टोचली, म्हणाले, `आता घाबरून जाण्याची गरज नाही`
अमेरिकेचे (America) नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden ) यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे.
वॉशिंग्टनः अमेरिकेचे (America) नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden ) यांनी कोरोनाची लस (Corona Vaccine)टोचून घेतली आहे. ७८ वर्षीय जो बायडेन कोरोनाच्या हाय रिक्स गटातील आहेत. सध्या, बायडेन कोरोना लसचा पहिला डोस देण्यात आला आहे. नवनिर्वाचित अध्यक्षांना लाईव्ह टेलिव्हिजनवर लस देण्यात आली. यावेळी बायडेन यांनी वैज्ञानिक, वैद्यकीय कर्मचार्यांसह सर्वांचे आभार मानले. त्यांना फिझरने (Pfizer) विकसित केलेल्या कोरोना लसचा एक डोस दिला. फायझरच्या कोरोना लसला अमेरिकेत अधिकृतपणे मान्यता देण्यात आली आहे.
प्रत्येकाला जानेवारीपासून मिळेल!
सोमवारी दुपारी डेलावेअरच्या क्रिस्टियाना केअर हॉस्पिटलमधील एका परिचारिकाने फायझर आणि बायोनोटॅक यांनी विकसित केलेल्या लसचा (Vaccine) पहिला डोस नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांना दिला. लोकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याच्या उद्देशाने बायडेन यांनी लाईव्ह टीव्हीवर कोरोना लस डोस घेतला. या दरम्यान, बायडेन म्हणाले, 'काळजी करण्याची काहीच कारण नाही. आता ही लस उपलब्ध आहे आणि मी तुम्हा सर्वांना लस घेण्यास आग्रह करत आहे. अमेरिकेत जानेवारीपासून कोरोनाची लस सर्वसामान्यांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
Vaccine पूर्णपणे सुरक्षित आहे
या संदर्भात बायडेन यांनीही ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, "शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी कोरोना साथीच्या रोगाचा बचाव करण्यासाठी केलेले अथक कार्य आम्ही कधीही विसरू शकत नाही." आम्ही सर्वांचे आभारी आहोत'. लसीकरण थेट दाखविण्यासाठीमागे अमेरिकेतील लोकांचा विश्वास वाढविण्यासाठी असे करण्यात आले आहे. बायडेन म्हणाले, 'आम्हाला नागरिकांना सांगायचे आहे की, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आता घाबरायचे काही नाही.'
यूएमध्ये सर्वात मोठी समस्या
कोरोनाच्या प्रभावाबद्दल बोलताना ते म्हणाले, सध्या कोरोना संक्रमित लोकांची एकूण संख्या ७७,१७२,२३७ आहे. या साथीमुळे आतापर्यंत १,६९९,६४४ लोकांचा बळी गेला आहे. कोरोनामुळे अमेरिका सर्वाधिक प्रभावित झाली आहे. सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कोरोनाला कमी लेखण्याची चूक केली होती, ज्याचा त्रास जनतेला सहन करावा लागला.