मुंबई : अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यात जिनेवात आयोजित केलेल्या बैठकीत अनेक मुद्यांवर सहमती दर्शवली. या दरम्यान बाइडेनने हे देखील स्पष्ट केलं की, 'ते वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करण्यासही मागे हटणार नाहीत.' दोन्ही नेत्यांमध्ये बुधवारी जवळपास चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी सांगितले की,'अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांत असं नातं तयार करायला हवं जे स्थिर आहे.'


Separate News Conference का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जो बाइडेन यांनी पुढे म्हटलं की,'मला वाटतं की, व्लादिमीर पुतिन यांनी मला जे सांगायचंय ते समजून घ्याव. तसेच का बोलत आहे ते देखील समजून घ्यावं. मानवाधिकार हे अमेरिकेतील प्रत्येकाच्या DNA मध्येच आहे. यामुळे ते कायमच सगळे मुद्दे उपस्थित करत असतात.' या बैठकीनंतर वेगवेगळ्या न्यूच कॉन्फरन्स शेड्युल केल्या. 2018 मध्ये जेव्हा पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह होता. या दरम्यान पुतिनने ट्रम्प यांना सॉकर बॉल देखील भेट दिला होता. 


चांगल्या नात्यावर बोलले Putin 


सगळ्यात अगोदर रशियाच्या राष्ट्रपतींनी बैठकीबाबत पत्रकांना माहिती दिली. ही बैठक अतिशय रचनात्मक होती आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांना समजून घेण्याची इच्छा व्यक्त केली. राष्ट्रपतींनी सांगितलं की,'अमेरिकेसोबत असलेल्या नात्यात सुधार होणार होईल हे सांगण कठीण आहे. मात्र आशेचं किरण दिसत आहे. अनेक मुद्यांवर आमची मत वेगळी आहे. मात्र दोन्ही पक्षांनी एकमेकांना समजून घेण्याचा आणि जवळ येण्याचा विचार केला आहे.'