स्टॉकहोम : स्वीडनच्या बेपत्ता झालेल्या एका महिला पत्रकाराच्या मृत्युबाबत पोलिसांना धक्का देणारी आणखी एक घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वीडनची पत्रकार असलेल्या ३० वर्षीय किम वॉल हिचं धडावेगळं झालेलं शीर पोलिसांना समुद्रकिनाऱ्यावर आढळंलय. डेन्मार्क पोलिसांना केपनहेगनच्या दक्षिण भागात एक बॅग सापडली. या बॅगेत किमचं कापलेलं शीर आणि पायाचा काही भाग टाकलेले होते. या बॅगेत काही कार पाईपही पोलिसांना आढळलेत. पोस्टमार्टेमनंतर हे शीर किमचंच असल्याचं स्पष्ट झालंय. 


१० ऑगस्ट रोजी किम डेन्मार्कच्या एका पानबुडी चालकासोबत - पीटर मॅडसनसोबत फिरायला निघाली होती... यानंतर ती बेपत्ता झाली होती. ११ दिवसांपूर्वी किमचं धड पोलिसांच्या हाती लागलं होतं. 


यानंतर साहजिकच पीटरवर पोलिसांचा संशय बळावलंय. पीटरनं मात्र किमची हत्या केल्याच्या आरोपांना साफ नाकारलंय. याआधी पीटरनं किमचं डोकं हॅचला धडकलं होतं... आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांसमोर म्हटलं होतं.