Viral Video - सोशल मीडियावर अनेक प्राण्याचे व्हिडीओ तुम्ही पाहत असाल. काही व्हिडीओ पाहून भीती वाटते तर काही व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही. कुत्रे, मांजरी, वाघ, सिंह यांचे मजेदार व्हिडीओ पण खूप व्हायरल होतं असतात. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ जास्त जास्त बघितला जातो आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 


काय आहे 'या' व्हिडीओत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कांगारू तुम्ही पाहिला आहात का? जर तुम्ही ऑस्ट्रेलियाला गेले असाल तर तिथे तुम्ही कांगारू पाहिला असेल. त्याचे काही व्हिडीओ पण सोशल मीडियावर पाहिला मिळतात. कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. या प्राण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते उडी मारत चालतात. कारण त्याचे पुढचे पाय लहान असतात आणि मागे पाय मोठे असतात. यामुळे त्यांना साधे चालणे कठीण जातं. 


या व्हिडीओमध्ये कांगारूने एका खेळाडूला असहाय्य करुन सोडलं आहे. या व्हिडीओतील भयानक दृष्य पाहून घाबरायला होतं. हा व्हिडीओ एका गोल्फ मैदानातील आहे. या मैदानात दोन खेडाळू असतात. त्यातील एक खेळाडू गाडी जवळ उभा असतो. तर दुसरा खेळाडू कांगारूशी दोन हात करताना दिसतोय. गोल्फ स्टिकने हा खेळाडून कांगारूपासून आपल्या बचाव करताना दिसत आहे. मात्र हा कांगारू खेळाडूचा पाठलाग सोडताना दिसत नाही आहे. कांगारू या खेळाडूच्या नाकी नऊ आणतो. शेवटी तो खेळाडू जमिनीवर पडतो. 


हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेक प्रश्नं पडतात. या कांगारूला खेळाडूकडून काही हवं होतं का? त्या खेळाडूला दुखापत झाली असेल ना? असे अनेक प्रश्नं आपल्याला भेडसावतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकतं नाही. 


हा Shocking Video सोशल मीडियावरील ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. The Drunken Tongue या आईडीवर हा व्हिडीओ आहे. 10 सेकंदचा हा व्हिडीओला आतापर्यंत हजारो वेळा बघण्यात आला आहे. या व्हिडीओवर यूजर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेक जण हसू हसू लोटपोट झाले आहेत.