Kanika Tekriwal Success Story : आपण हवाई सुंदरी व्हावे असे अनेक तरुणींचे स्वप्न असते. तरी काही तरुणींना पायलट होण्याची इच्छा असते. आपलं स्वत:चं विनाम असावं असं स्वप्न पाहणाऱ्या तरुणी क्वचितच असतील त्यापैकीच एक आहे कनिका टेकरीवाल (Kanika Tekriwal).अंबानी, अदानी यांसारख्या उद्योगपतींसह भारतात फार मोजक्याच लोकांकडे स्व:ताचे खाजगी विमान आहे. मात्र, अंबानी, अदानी कुणीच कनिकासोबत बरोबरी करु शकत नाहीत. कनिका तब्बल 10 विमानांची मालकीन  असलेली भारतातील एकमेव महिला आहे. कनिका सक्सेस स्टोरी खूपच प्रेरणादायी आहे. 


हे देखील वाचा... अंबानींना अर्जंट पाहिजे 255000000000 इतके कर्ज; कारण समजल्यावर डोक्यावर हात माराल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

33 वर्षाच्या कनिका भारतातील सर्वात यशस्वी उद्योजिका आहे. धाडस, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्टी ही प्रत्यक्षात पूर्ण करता येवू शकते हे कनिकाने सिद्ध करुन दाखवले आहे.  2011 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी कनिकाला कर्करोगाचे निदान झाले.  या आजारावर मात करत कनिकाने भारतातील सर्वात मोठी खासगी जेट कंपनी स्थापन केली. JetSetGo असे कनिकाच्या कंपनीचे नाव आहे.


हे देखील वाचा... पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती; 3800000000000... संपत्तीचा आकडा वाचताना बोबडी वळेल


2012 मध्ये कनिकाने तिचा  JetSetGo नावाचा स्टार्टअप सुरु केला.  विमान भाड्यानं देणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे. कनिकाची JetSetGo ही कंपनी चार्टर्ड विमानं आणि हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देते. JetSetGo ही कंपनी अग्रगण्य एअरक्राफ्ट एग्रीगेटर म्हणून प्रसिद्ध आहे. आतापर्यंत या कंपनीनं एक लाखांपेक्षा अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. JetSetGo कंपनीमार्फत तब्बल 6 हजार यशस्वी उड्डाणं झाली आहेत.


कनिकाच्या जेटसेटगो या कंपनीची उलाढाल 150 कोटी रुपये आहे. 2023-24 या वर्षात JetSetGo कंपनीने 341 कोटींची कमाई केली आहे. कनिकाच्या JetSetGo कंपनीत उद्योगपती पुनीत दालमिया आणि क्रिकेटर युवराज सिंग यांनीही गुंतवणूक केली आहे. 


7 जून 1990 रोजी भोपाळमध्ये मारवाडी कुटुंबात कनिकाचा जन्म झाला. कनिकाने कोव्हेंट्री विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. 10 खाजगी जेट आहेत. कनिका ही भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे तीची एकूण संपत्ती 420 कोटी रुपये आहे.