आडनाव हिंदू वाटत नसल्यानं गरब्यात जाण्यापासून रोखलं
आडनावं हिंदूंसारखी नसल्यानं, आयोजकांनी त्यांना प्रवेश नाकारला.
अटलांटा : अमेरिकेतल्या अटलांटामध्ये आयोजित गरबा कार्यक्रमात सहभागी व्हायला हिंदुंनाच मज्जाव केला गेला. मुळचे गुजरातमधल्या वडोदराचे आणि सध्या अमेरिकेत शास्त्रज्ञ म्हणून नोकरी करत असलेले करण जानी यांना, या अपमानास्पद अनुभवाला सामोरं जावं लागलं. २९ वर्षीय करण जानी त्यांच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत नवरात्रीनिमित्त अटलांटामध्ये आयोजित गरबा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र त्यांची आडनावं हिंदूंसारखी नसल्यानं, आयोजकांनी त्यांना प्रवेश नाकारला.
जानी यांच्याकडे दुर्लक्ष
गेली काही वर्षं आपण नियमितपणे इथल्या गरबामध्ये सहभागी होत असल्याचं करण जानी यांनी आयोजकांना सांगितलं.
तसंच आपण स्वतः आणि आपल्यासोबत असलेले सर्व मित्रमैत्रिणी हिंदूच असल्याचं, त्यांनी आयोजकांना वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत, आयोजकांनी करण जानी आणि त्यांच्या मित्रपरिवाराला गरब्यामध्ये सामील होण्यापासून रोखलं.