आळशी कुठची! कपड्यांचा कंटाळा म्हणून शरीरभर गोंदवले टॅटू
कपडे घालण्याचा कंटाळा येतो असं तुम्ही कधी ऐकलंय का? जर्मनीच्या एका महिलेने कपड्यांचा कंटाळा येतोे म्हणून संपूर्ण अंगावर टॅटू काढले आहेत.
मुंबईः कामाचा कंटाळा येतो हे आपण नेहमीच ऐकलं असेल मात्र कपडे घालण्याचा कंटाळा येतो असं तुम्ही कधी ऐकलंय का?
जर्मनीच्या 50 वर्षीय क्रेस्टीन टॅटूमुळे सोशल मीडियावर ओळखली जाते. टॅटू मॉडेल क्रिस्टिनने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक हॉट फोटो शेअर केले आहेत. मूळची जर्मनीतील या टॅटू मॉडेलने 5 वर्षांपूर्वी तिच्या शरीरावर पहिला टॅटू बनवला आणि आज तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावर टॅटू आहेत.
आळसामुळे टॅटूवर लाखो रुपये खर्च करणार्या एका महिलेने काही फोटो शेअर केली आहेत, ज्यात गेल्या काही वर्षांत तिचा लूक असा बदलला हे दिसतं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कर्स्टिन ट्रिस्टनने आतापर्यंत तिच्या टॅटूवर 24 लाखांहून अधिक खर्च केले आहेत आणि आता तिने तिच्या Instagramवर टॅटूच्या आधी आणि नंतरचे फोटो शेअर केलेत.
क्रेस्टिनने तिचे 30 वर्ष, 8 आठ वर्षापूर्वीचे आणि आताचे असे तीन फोटो शेअर केले आहेत. 1992, 2014 आणि 2022 मध्ये क्रेर्स्टिन कशी दिसत होती फोटोत दिसत आहे. सहा वर्षांपूर्वी तिने @tattoo_butterfly_flower नावाने Instagram वर अकाऊंट तयार केलं. सध्या तिचे सुमारे दोन लाख फॉलोअर्स आहेत.
क्रेस्टिनने तिच्या अंगावर रंगीबेरंगी फुल, पक्षी, फुलपाखराच्या डिझाईन्स काढल्या आहेत. आपला छंद पूर्ण करण्यासाठी तिने कोणाचीही पर्वा केली नाही. कर्स्टिनला कपडे घालण्याचा आळस येतो, ज्यामुळे ती कमी कपडे घालते आणि बाकीच्या भागांवर टॅटू बनवते.