रोलरकोस्टर अडकल्याने तीन तास मुलं हवेत उलटी लटकत होती; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO
अॅडव्हेंचर पार्कमध्ये मोठ्या पाळण्यांच्या अनेक दुर्घटना याआधी घडल्या आहेत. पण अमेरिकेत रोलर कोस्टर अडकल्याने त्यातील मुलं तब्बल तीन तास हवेत उलटी लटकत होती. अंगाचा थरकाप उडवणारा या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अॅडव्हेंचर पार्कमध्ये मोठ्या दुर्घटना झाल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. अशा ठिकाणी असणारे मोठे पाळणे आकर्षणाचं केंद्र असतात. पण हेच पाळणे अनेकदा जीवावर बेततात. दरम्यान, अमेरिकेत अशीच एक घटना घडली आहे. या दुर्घटनेतून लहान मुलं थोडक्यात बाचवली आहेत. रोलर कोस्टर मधेच बंद पडल्याने मुलं तब्बल तीन तास हवेत उलटी लटकत होती. अंगाचा थरकाप उडवणारा या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमधील क्रँडनमध्ये फॉरेस्ट काऊंटी फेस्टिव्हलमध्ये ही दुर्घटना घडली.
तीन तास हवेत लटकत होती मुलं
मिळालेल्या माहितीनुसार, रोलर कोस्टर बंद पडला तेव्हा त्यात आठ लोक बसलेले होते. यामधील 7 जणं लहान मुलं होती. यानंतर त्यांची सुटका करण्यासाठी तब्बल तीन तास लागले. कारण आपातकालीन पथकाला बचावकार्य करण्यास फार वेळ लागत होता. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावण्यात आलं होतं.
अशाप्रकारे करण्यात आली सुटका
अग्निशमन दलाचे जवान ईएमटी एरिका कोस्टिचका यांनी स्थानिक प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं की, बचावकार्य हे काही लगेच होण्यासारखी गोष्ट नाही. बचावकार्य करण्यासाठी जवळच्या ठिकाणांहून आपातकालीन रेस्पॉर्न्डर्सला बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर अखेर त्यांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली.
रोलर कोस्टर कसा काय अडकला?
कोस्टिचका यांनी सांगितलं की "त्या मुलांनी फार हिंमत दाखवली. ते फार घाबरले होते आणि बराच वेळ हवेत उलटे लटकत होते". अधिकाऱ्यांनी दिलेल्य माहितीनुसार, रोलर कोस्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. पण त्यामागील नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. क्रँडन अग्निशमन विभागाचे कॅप्टर ब्रेनन कुक यांनी डब्ल्यूजेएफडब्ल्यू टीव्हीशी बोलताना सांगितलं की, एक यांत्रिक त्रुटी आली होता इतकीच माहिती आमच्याकडे आहे.
काती डेक्लार्क नावाच्या एका महिलेच्या दोन मुली या रोलर कोस्टरमध्ये बसलेल्या होत्या. जेव्हा रोलर कोस्टर अडकला आणि मुलगी हवेत उलट्या लटकू लागल्या तेव्हा त्या फार घाबरल्या होत्या. पण त्यांच्याकडे तिथे उभं राहून बचावकार्याची वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. "आम्ही सर्वजण नेमकं त्यांना कसं वाचवता येईल याचाच विचार करत होतो", असं त्यांनी सांगितलं.
एका फेसबुक युजरने ही सर्व घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत व्हिडीओ शेअर केले आहेत. त्याने दिलेल्या माहितीनुसार, अडकलेल्यांमधील एका लहान मुलीने फार मोठं धैर्य दाखवत आपल्याआधी वृद्ध व्यक्तीला वाचवण्यास सांगितलं. तिचा पुरस्कार देऊन सन्मान केला पाहिजे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. सर्व मुलं सुरक्षितपणे कुटुंबाकडे पोहोचली आहेत.