किम जोंग लठ्ठ लोकांना करणार बारीक, निश्चयावर ठाम... प्यायला दिले `हे` पेय
Kim Jong Un: उत्तर कोरियाचे नेता किम जोंग यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते महिलांच्यासमोर भाषण करताना दिसत आहेत. महत्त्वाच म्हणजे यावेळी ते अश्रू पुसताना दिसले.
North Korea : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन काही दिवसांपूर्वी रडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ते देशातील महिलांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्याची विनंती करत होते. त्याच्याकडे पाहून असे वाटले की, किम जोंग उनला खरोखर आपल्या लोकांची खूप काळजी आहे. किमने नुकतेच असे काहीतरी केले आहे, ज्यावरून असे वाटते की त्याला खरोखरच लोकांच्या कल्याणासाठी काहीतरी करायचे आहे. उत्तर कोरियातील लोक लठ्ठ होऊ लागले आहेत. वजन वाढीची समस्या मोठी होत चालली आहे. असं असताना किम जोंग उनने यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, किम जोंगने आपली लो कॅलरी बिअर लोकांसाठी लाँच केली आहे. जिथे एकीकडे हजारो लोक उपासमारीने मरत आहेत. दुसरीकडे, सरकार चालवणारी दारूभट्टी वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी बिअर तयार करत आहे. अशा लोकांमध्ये लाइट बिअरला खूप मागणी आहे. यामुळेच या लोकांना डोळ्यासमोर ठेऊन उत्तर कोरियामध्ये बिअर सुरू करण्यात आली आहे.
वजन वाढण्यास प्रतिबंध करणाऱ्या बिअरची मागणी वाढली
Taedonggang नावाच्या या बिअरमध्ये साखर आणि कॅलरीजचे प्रमाण कमी आहे. ज्यांना खेळाची आवड आहे आणि वजन जास्त आहे अशा लोकांसाठी हे फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. 2001 मध्ये स्थापन झालेल्या ब्रुअरीमध्ये ही बिअर तयार केली जात आहे. उत्तर कोरियामध्ये टूर आयोजित करणाऱ्या यंग पायोनियर टूर्स या कंपनीचे व्यवस्थापक रोवन बियर्ड यांनी सांगितले की, उत्तर कोरियामध्ये अशा बिअरला जोरदार मागणी आहे, ज्यामुळे पुरुषांचे वजन वाढणे टाळता येते.
तुम्हाला बिअरसाठी टोकन मिळेल
उत्तर कोरियामध्ये पुरुषांना दर महिन्याला दोन लिटर बिअरसाठी टोकन मिळते. राजधानी प्योंगयांगमध्ये सध्या असलेल्या भट्टीत बिअर वेगाने तयार केली जात आहे, जेणेकरून लोकांची मागणी पूर्ण करता येईल. ज्या भट्टीमध्ये बिअर तयार केली जात आहे, त्या भट्टीतून तयार होणारी दारू यापूर्वीच चीन आणि दक्षिण कोरियामध्ये निर्यात करण्यात आली आहे. मात्र, उपासमारीच्या आहारी गेलेले उत्तर कोरियाचे लोक वजन कमी करण्यासाठी इतके का हताश आहेत, हे अद्याप समजलेले नाही.
या बिअरबाबत असं सांगितलं जातं की, यामध्ये कमी साखर आणि कमी कॅलरीज आहेत. स्पोर्ट्स खेळणाऱ्या लोकांसाठी ही दारू चांगली आहे. तसेच वजन जास्त असणाऱ्या लोकांसाठी देखील हे चांगल आहे. जपानच्या आऊटलेट Choson Sinbo यांनी ही माहिती दिली. असं म्हटलं जातं की, किम जोंग यांच्या प्रशासनात अनेक कुटूंब भूकबळी होत आहेत. देशातील अधितर लोक फक्त बिअर किंवा तांदळापासून तयार झालेली बिअर सोजू खरेदी करु शकतात.