नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचा तानाशाहा किम जोंग उन यांची 12 जूनला भेट होणार आहे. या बैठकीसाठी सिंगापूरमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. बैठकीत सहभागी होण्यासाठी उत्तर कोरियाचा राजा किम जोंग उन दोन दिवस आधीच सिंगापूरला पोहोचला आहे. दुसरीकडे डोनल्ड ट्रंप देखील जी7 देशांची परिषद सोडून सिंगापूरसाठी रवाना झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंगापूर सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नोटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान हसीन लूंग सिंगापुरमध्ये ट्रंप आणि उन यांच्या बैठकीच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांशी वेगवेगळी चर्चा करतील. रविवारी आणि सोमवारी किम जोंग उन आणि डोनाल्ड ट्रंप यांच्याशी वेगवेगळी चर्चा होणार आहे. सिंगापूरमध्ये 12 जूनला ट्रंप आणि उन यांच्या बैठकीचा मुख्य अजेंडा राजकीय आणि आर्थिक लाभच्या बदल्यात उत्तर कोरियाचं अणू निशस्त्रीकरण असा असेल.


किम जोंग आणि डोनाल्ड ट्रंप यांच्या या बैठकीदरम्यान सिंगापूरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सिंगापूर पोलीस आणि नेपाळी गोरखा सुरक्षेवर नजर ठेवून आहेत. कार्यक्रमाच्या स्थानी जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.