वॉशिंग्टन : कोणत्याना कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहणारी किम कर्दाशियान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळेस तिने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापासून ते राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरही जगभरात विविध कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प हे चर्चेंत किंवा वादात राहिल्याचे पाहायला मिळते. अभिनेत्री किम कर्दाशियानने ट्रम्प यांच्यावर टीका केल्याने ती आणि ते दोघे पुन्हा चर्चेत आलेत. किमने म्हटलंय की माझी ४ वर्षांची मुलगी देखील ट्रम्प यांच्यापेक्षा राष्ट्राचा कारभार बरा करू शकेल. 


हे तिने गंमतीत म्हटलं असलं तरी यापूर्वी अनेक कलाकारांनी ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केलेली आहे.  तिने ही टीका गांभीर्याने केली नसली तरी सोशल मीडियावर काहींनी तिला गांभीर्याने घेत तिच्यावर टीका केली आहे. काहीजण प्रसिद्धीत राहण्यासाठी काहीही वक्तव्य करतात असेही काहीजण म्हणाले. 


माझी मुलगी उत्तम पर्याय 


एका वेबसाईटला ‘किम’ने मुलाखत दिली ज्यात ती म्हणाली की ” सध्याचे राष्ट्रपती नाही तर हा देश इतर कोणीही यापेक्षा उत्तम पद्धतीने चालवू शकेल. माझी मुलगीही यासाठी उत्तम पर्याय असेल “ या वक्तव्यामुळे किम कर्दाशियान पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिच्या या वक्तव्याची खिल्ली उडविली जात आहे.