King Cobra In Kitchen Viral Video: सापाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सापाचे व्हिडीओ पाहून थरकाप उडतो. पण सापांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे. त्यामुळे सापाचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Snake Video Viral) वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. एका घरात चक्क किंग कोब्रा घुसल्याने एकच धावपळ उडाली. किचनमध्ये असलेल्या टेबलाखाली जाऊन किंग कोब्रा (King Cobra) लपला होता. या सापाची लांबी तब्बल दहा फूट इतकी होती. सापाला पाहताच घरातील सदस्यांनी बाहेर पळ काढला आणि सर्पमित्राला सांगितलं. अथक प्रयत्नानंतर या सापाला पकडण्यात यश आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

36 सेकंदाचा हा व्हिडीओ NowThis नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्टमध्ये हा व्हिडीओ थायलंडमधील असल्याचं सांगण्यात आलं आहे. सापाला पकडण्याचं थरारनाट्य पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सापाला पकडण्यासाठीच्या स्टिकने किचनखाली असलेल्या आधी बाहेर काढलं. त्यानंतर त्याची शेपटी पकडून बाहेर खेचलं. यावेळी सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण सर्पमित्रांनी मोठ्या शिताफिने साप पकडला. 



या व्हिडीओ युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, "अरे बापरे हा साप कुणाला चावला तर जागीच मृत्यू व्हायचा, काळजी घ्या." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "किती मोठा आहे साप..खरंच नुसता व्हिडीओ पाहून भिती वाटते."