जॉर्जिया : भररस्त्यात एक साप दुसऱ्या विषारी सापाला गिळत असताना एका व्यक्तीची त्यांच्यावर नजर पडली. त्याने या सापांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील जॉर्जियामध्ये एका व्यक्तीने नुकताच एका रॅटल सापाला विषारी किंग कोब्राकडून गिळतानाचा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये एका सापाला किंग कोब्रा गिळताना दिसत आहे. 80 वर्षीय टॉम स्लॅगने ही घटना पाहिल्याबरोबर ते आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली.



जॉर्जियाचे टॉम स्लॅग यांनी आपल्या मोबाईलमध्ये ही खतरनाक घटना रेकॉर्ड केली . व्हिडीओमध्ये विषारी रॅटल सापाला किंग कोब्रा साप गिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ही शॉर्ट व्हिडीओ क्लिप जॉर्जिया डिपार्टमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेजतर्फे पोस्ट करण्यात आला आहे.


सोशल मीडियावर पोस्ट होताच हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. अनेक युजर्स म्हणत आहेत की, रॅटल सापाने नुकतीच मोठी शिकार गिळलेली दिसते. त्याच दरम्यान, किंगकोब्रा सापाने त्याच्यावर हल्ला करून रॅटल सापाला गिळले असावे.


किंग कोब्रा साप साधारणतः सासा, छोटे प्राणी, कासवाचे अंडे, सरपटनारे प्राणी आणि अन्य साप खातात. किंग कोब्रा अत्यंत विषारी आणि घातक असतात. ते अतिशय चपळाईने शिकार करतात.