सोशल मीडियावर कधी कोण फेमस होईल हे सांगता येत नाही. असाच एकजण स्टार झालेला व्यक्ती म्हणजे किली पॉल. त्याच किली पॉलबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आलीय. टांझानियामध्ये राहणाऱ्या किली पॉलवर अज्ञातांनी चाकू हल्ला केल्याचं समोर आलंय. या हल्ल्यात किली जखमी झालाय. ही बातमी स्वतः किली पॉल यानेच सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किली पॉल हा त्याच्या डान्सच्या व्हिडीओने जगभर प्रसिद्ध आहे. त्याच्या डान्सची स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केली होती. 'मन की बात' कार्यक्रमात त्यांनी किली पॉलचा उल्लेख केला होता. 


किली पॉल हा प्रसिद्धीच्या झोतात असतानाच त्याच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये घटनेचे वर्णन करताना किली पॉल म्हणतो, 'माझ्यावर 5 जणांनी हल्ला केला आणि काठीने मारहाणही केली'. अज्ञातांनी किली पॉलला एवढी मारहाण केली की त्याला पाच टाकेही पडले. किली म्हणते की, 'मी दोघांना मारहाण करुन स्वतःला वाचवू शकलो'.


आणखी एक गोष्ट शेअर करताना किली लिहितो की, मी प्रसिद्ध झाल्याने मला खाली खेचायचं आहे. पण देव मला नेहमी प्रसिद्धीच्या झोतावर ठेवतो. माझ्यासाठी प्रार्थना करा.' सध्या किली पॉल ठिक असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.