नवी दिल्ली : चीनची ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाने एका दिवसात आपले जुने सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. आता एका दिवसात आतापर्यंतचा सर्वात जास्त सेल करण्याचा रेकॉर्ड कायम केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अलीबाबाने ११ नोव्हेंबरला १ लाख ६५ हजार कोटी रूपयांच्या(१० अरब डॉलर) वस्तूंची विक्री केली. चीनच्या या प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीने सुरूवातीच्या तीन मिनिटातच १.५ अरब डॉलर म्हणजेच ९.८ हजार कोटी रूपयांची विक्री केली होती. तर गेल्यावर्षी इतकाच सेल ६ मिनिट ३ सेकंदात केला होता. 


यावर्षीच्या सेल इव्हेंटमध्ये अलीबाबाने १.६५ लाख कोटी रूपये(२५.३ अरब डॉलर)ची विक्री केली. चीनमध्ये ११ नोव्हेंबरला सिंगल डे म्हणून साजरा केला जातो. इथे याचा ट्रेन्ड १९९० मध्ये सुरू झाला झाला. तरूणांमध्ये याची लोकप्रियता आहे. याच दिवशी अ‍ॅमेझॉनने एका दिवसात सर्वात जास्त ६ हजार कोटींची विक्री केली होती. 


कोण आहे जॅक मा?


५३ वर्षीय जॅक मा आशियातील चौथा सर्वात श्रीमंत माणूस आहे. फोर्ब्स २०१७ च्या यादीनुसार त्यांची एकूण संपत्ती साधारण ३९.३ बिलियन डॉलर इतकी आहे. जॅक मा यांनी १९९९ मध्ये त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये अलीबाबाची सुरूवात केली होती. 


कसा आला विचार?


मीडिया रिपोर्टनुसार, अलीबाबाचे मालक जॅक मा १९९४ मध्ये जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा तिथे इंटरनेट पाहून आश्चर्यचकित झाले. त्यानंतर चीनमध्ये परत येऊन त्यांनी ‘चायना पेज’ लॉन्च केलं. ही चीनची पहिली ऑनलाईन डिरेक्टरी होती. त्यानंतर ते देशात मिस्टर इंटरनेट म्हणून लोकप्रिय झाले. त्यानंतर जॅक मा ने २१ फेब्रुवारी १९९९ मध्ये अलीबाबाची सुरूवात केली. ही कंपनी त्यांनी १७ मित्रांसोबत सुरू केली होती. 


या कंपन्याही त्यांच्याच


अलीबाबा ग्रुपच्या मोठ्या कंपन्यांमध्ये Alibaba.com, Taobao, Alibaba Cloud, AliExpress, Yahoo! China, Alibaba Pictures, South China Morning Post, UCWeb, आणि Lazada प्रमुख आहेत.


पाचवीत दोनदा फेल


जॅक यांना शिक्षणाची आवड नव्हती. ते पाचवीत दोनदा फेल झाले होते आणि आठवीमध्ये तीनदा फेल. जॅक मा यांच्याकडे कम्प्युटरचं कोणतही बॅकग्राऊंड नव्हतं. १९८० मध्ये ते एका शाळेत शिक्षक म्हणून काम करु लागले. त्यानंतर त्यांनी एक कंपनी सुरू केली आणि नंतर अलीबाबा.


अलीबाबाचा बिझनेस


चीनची कंपनी अलीबाबाची मार्केट व्हॅल्यू सध्या ३ हजार अरब रूपयांपेक्षाही जास्त आहे. ई-कॉमर्ससोबत अजूनही अनेक कंपन्या त्यांनी सुरू केल्या. एकूण या ग्रुपच्या ३७ कंपन्या आहेत. भारतातील पेटीएमसहीत जगातल्या अनेक कंपन्यांमध्ये त्यांचे शेअर्स आहेत.