विचार करा की अशी एखादी जागा जिथे तुम्हाला रोजच सोने मिळेल. तर तुम्ही बॅग घेऊन लगेच निघाल. परंतु हे सोनं मिळवणं तेवढं सोप नसतं. जगातील अशा काही जागा आहेत. जिथे लोकं सकाळी उठतात आणि नदी किनारी जातात. तिथे त्यांना सोने मिळते. ते सोनं विकून आपला चरितार्थ चालवतात.


कुठे आहे ही जागा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Deutsche Welle च्या एका रिपोर्टनुसार हा दक्षिण थायलँडचा परिसर आहे. या परिसराला गोल्ड माऊंटेन असं म्हटलं जातं. अनेक वर्षांपासून येथे सोन्याचे खननकार्य सुरू होते. कोरोना विषाणूमुळे लोकांच्या रोजीरोटीचा महत्वाचा पर्याय येथील सोने बनले आहे. आता लोकं चिखल गाळून त्यातून सोने निवडत आहेत.


किती सोनं निघतं


असं नाहीये की या ठिकाणी यावं आणि बॅग भरून सोनं घेऊन जावं. सोनं मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. रिपोर्टच्या मते 15 मिनिटं काम केल्यानंतर सोनं सापडतं. तेवढ्या सोन्यात एका दिवसाचं पोट भरू शकतं. 


मुस्लिम कट्टरपंथी आणि फुटीरतावाद्यांमुळे हा परिसर अन्य थायलंडच्या परिसरापासून वेगळा आहे. येथे हॉटेल रिसॉर्ट नाहीत. अशातच ही लोकं सोनं शोधायची कामं करतात. लोकांच्या व्यवसायवर कोरोना विषाणूचा परिणाम झाला आहे.


भारतातही अशी एक जागा


भारतात अशी एक नदी आहे की, जेथे सोने निघते. नदीच्या रेतीत सोनं सापडतं. नदीच्या आजूबाजूला राहणारे लोकं रेतीतून सोनं काढून आपला प्रपंच चालवतात. झारखंडच्या रत्नगर्भामध्ये सुवर्णरेखा नावाच्या नदीतून सोनं काढलं जातं. ही नदी झारखंड, प. बंगाल आणि ओडिसाच्या काही भागातून वाहते. सुवर्णरेखा आणि तिची सहाय्यक नदी करकरीमध्येही सोन्याचे कण सापडतात. लोकांचं म्हणणं आहे की करकरी नदीतून वाहनारे सोन्याचे कण सुवर्णरेखा नदीत पोहचतात.