Unknown Facts about Mirror: असं म्हणतात, की आरसा कधीच खोटं बोलत नाही. तुमच्या अंतर्मनात दडलेल्या गोष्टी त्यात दिसत नसल्या तरीही तुमच्या देहबोलीतून मात्र हे सर्व नकळतच जगासमोर येत असतं. घराबाहेर पडण्यापूर्वी, घरात येताच किंवा कुठंही गेलं असता आधी आपण कसे दिसतो हे जाणून घेण्यासाठी आरशासमोर उभे राहणारे अनेकजण असतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हीआम्हीही यापैकीच एक. पण, कधी विचार केलाय का, की आरशामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणी पाहिलं असेल ? किंबहुना आरशाचा शोध कधी आणि कसा लावला गेला याचीतरी तुम्हाला कल्पना आहे ? 


आधी व्हायचा पाण्याचा वापर... ? 
प्राचीन पुराणकथांचा संदर्भ पाहाल, तर त्यावेळी आरसे वापरातच नव्हते. कारण त्यावेळी प्रतिबिंब पाहण्यासाठी स्थिर पाण्याचा वापर केला जात होता. पॉलिशिंग तांब्यापासून बनवण्यात आलेले आरसे मेसोपोटामिया (आताचं इराक) आणि सोबतच मिस्रमध्ये इसवीसनपूर्व 3000 ते 4000 त्या दरम्यानच्या काळात तयार करण्यात आले होते. 


यानंतर 1000 वर्षांनी दक्षिण अमेरिकेमध्ये पॉलिश करण्यात आलेल्या दगडानं आरशाची काच बनवण्यात आली होती. IFL Science च्या वृत्तानुसार इसवीसन पहिल्या शतकात रोमन लेखक प्लिनी द एल्डरज्वारा काचेच्या आरशांचा संदर्भ मिळाला. 


त्या काळातील आरशांचा काचा, सध्याप्रमाणं नव्हत्या. आरसे अतिशय लहान होते. तेव्हा दिसणारं प्रतिबिंब तितकं स्पष्टही नव्हतं. या प्रतिबिंबासाठी 1835 पर्यंतची वाट पाहावी लागली होती. 


पहिल्यांदाच आरशांमध्ये स्वत:ला पाहणारी व्यक्ती कोण ? 
तेबिली (Tebele) नावाच्या एका व्यक्तीनं पहिल्यांदाच आरशामध्ये स्वत:ला स्पष्टपणे पाहिलं होतं. यानंतर त्यांच्या तुकडीच्या प्रमुखानं म्हणजेच  पुया (Puya)नं आरशामध्ये स्वत:ला पाहिलं. हा आगळावेगळा चमत्कार पाहताना त्यांना कमालच वाटली होती. 


मानवानं प्रत्येक काळानुरुप स्वत:मध्ये काही बदल केले, नवे शोध लावले. वरदान ठरलेल्या अशाच शोधांपैकी एक म्हणजे, आरसा.