नवी दिल्ली : समोरील व्यक्तीच्या वयाचा अंदाज वर्तविण्यात आपण अनेकदा चुकतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटोज दाखविणारा आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला आज आम्ही अशा एका व्यक्तीची भेट घडवून आणणार आहोत ज्याचं वय तुम्हाला सजल्यावर चक्रावून जाल. 


वयोवृद्ध दिसणा-या या व्यक्तीचं नाव आहे पावेल लाडियायक. पावेल हा पोलंडचा निवासी आहे. यांच्या वयासंदर्भात बोलायचं झालं तर हे दिसायला वयोवृद्ध दिसतात मात्र, यांच वय आहे केवळ ३५ वर्ष. पाहूयात काय आहे हा प्रकार..



प्रसारमाध्यमांच्या सुत्रांनुसार, पावेल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, काही वर्षांपूर्वी त्यांचे केस आणि दाढी चॉकलेटी (ब्राऊऩ) रंगाचे होण्यास सुरुवात झाली. त्यांना हे अजिबात आवडत नव्हतं. 



मग, त्यांनी आपले केस आणि दाढी पूर्ण सफेद करण्याचं ठरवलं. त्यानंतर पावेल यांनी आपला पूर्ण मेकओव्हर केला. पण त्यानंतर ते वयस्कर दिसायला लागले. मात्र असे असले तरी त्याची शरीरयष्टी एखाद्या पहेलवानासारखी होती. 



पावेल सोशल मीडियावर म्हणजेच इंस्टाग्राम आणि फेसबूकवर खुपच अॅक्टीव्ह होते. पण त्यांनी आपल्या ओल्ड लूकचे फोटोज जेव्हा सोशल मीडियात शेअर केले तेव्हापासून त्यांची लोकप्रियता आणखीनच वाढल्याचं पहायला मिळालं.



पावेल यांच्या मते, ज्यावेळी ते १६ वर्षांचे होते तेव्हापासून त्यांनी व्यायामाकडे लक्ष दिलं. मात्र, मजा-मस्ती करताना त्यांनी नंतर व्यायामाकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना स्वत:कडे पाहून लाज वाटत होती. 



मग, त्यांनी स्वत:ला बदलण्याचा निर्णय घेतला आणि मेहनत करुन जबरदस्त बॉडी बनवली. 


Image Courtesy: pavel_ladziak Instagram