नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी आहे इवांका ट्रंप. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इवांका ही ग्लोबल आंत्रप्रेन्योरशिप समिटचा भाग असून ती भारतात पोहोचली आहे. इवांका हैदराबादमध्ये २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे. त्याचप्रमाणे ग्लोबल समेटमध्ये इवांका इतर १०० आंत्रप्रेन्योर्सला देखील भेटणार आहे. 


मात्र तुम्हाला हे माहित आहे का, की इवांका राष्ट्रपतीची मुलगी होण्याबरोबरच ती एक उत्कृष्ठ बिझनेस वुमन देखील आहे. 
इवांका फक्त ३६ वर्षाची असून ती आपल्या वडिलांचा बिझनेस सांभाळत आहे. तसेच इवांका डोनाल्ड ट्रंपची सीनियर एडवायझर देखील आहे. 



ट्रंप हॉटेल्सची को - फाऊंडर 


इवांका युनिर्व्हसिटी ऑफ पेंसिलवेनियाच्या व्हॉर्टन स्कूल ऑफ बिझनेसमधून पदवीधर आहे. २००९ मध्ये तिने जरेद कुशनरसोबत विवाह केला होता. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ती ट्रंप ऑर्गनायझेशनची एक्झिक्युटिव वाइस प्रेसिंडेंट आहे. तसेच ट्रंप हॉटेल्सची को फाऊंडर देखील आहे. २००७ मध्ये इवांकाने ज्वेलरी कलेक्शन लाँच केलं आहे. तर २०११ मध्ये इवांका नावाने रिटेल फॅशन लाइन सुरू केलं आहे. त्यासोबतच शूज, हँडबॅग, अपॅरल्स, एक्ससेसरीज, ज्वेलरी, फ्रेगरेंस सारखे प्रोडक्टस ऑनलाइन आणि रिलेट स्टोर्स सारख्या गोष्टी विकल्या जातात. 


१९३५ करोड रुपयांची आहे मालकीण 


अमेरिकेच्या राष्ट्र्रपतीची सिनियर एडवायझर असल्यामुळे इवांकाने काही दिवसांपूर्वीच आपल्या संपत्तीची घोषणा केली आहे. व्हाइट हाउसच्या रिपोर्टनुसार 
इवांका जरी राष्ट्रपतींची सल्लागार म्हणून काम करत असली तरीही यासाठी ती कोणताही पगार घेत नाही. याव्यतिरिक्त इवांका ३० करोड डॉलर म्हणजे १९३५ करोड रुपयांची मालकीण आहे. 


महिलांसीठा खास कॅम्पेन 


इवांका ट्रम्प २०१४ पासून 'वुमन हू वर्क' असं एक कॅम्पेन चालवत आहे. २०१७ मध्ये याच थीमवर तिने एक पुस्तकं देखील लिहिलं आहे. यामध्ये तिने मी एक इस्टेट डेव्हलपर असून आंत्रप्रेन्योर असल्याच म्हटलंय. मी जगभरात आयकॉनिक प्रॉपर्टी बिल्ड करत असून असा बिझनेस वाढवत आहे जो महिलांना प्रोत्साहन देत आहे.