इस्त्राईल : इस्त्राईलची आयर्न डोम सिस्टम ही जगातील सर्वोत्कृष्ट क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. ही एक प्रणाली आहे जी कोणत्याही क्षेपणास्त्राच्या हल्ल्यापासून संपूर्ण शहराचा बचाव करू शकते. या व्यवस्थेमध्ये रॉकेट्स, मोर्टार शेल, यूएव्ही आणि क्षेपणास्त्र हवेत सोडले जाऊ शकतात. हेच कारण आहे की हमासने इस्त्राईलच्या दिशेने 300 हून अधिक गोळे फेकले, त्यापैकी केवळ 1 डझन जमिनीवर पडू शकले. इस्राईलने 2006 मध्ये या प्रणालीवर काम सुरू केले. याचदरम्यान इस्राईल आणि लेबनॉन यांच्यात युद्ध पेटलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या युद्धामुळे दहशतवादी हिज्बुल्ला संघटनेने इस्राईलच्या शहरांमधील भूमीवरुन हजारो गोळे फेकले होते, त्यामुळे इस्रायलचे मोठ्या प्रामाणात नुकसान झालं होतं. यानंतरचं आयर्न डोम सिस्टम प्रणालीचा शोध लागला. या प्रणालीमध्ये तीन ते चार गोष्टी एकत्र काम करतात. पहिली गोष्ट म्हणजे एक शक्तिशाली रडार जो वेळेत आकाशातील सर्वात लहान ऑब्जेक्ट पाहून अलर्ट जारी करतो.


हा अलर्ट ज्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी बसलेले असतात त्याठिकाणांच्या व्यवस्थापन प्रणालीशी निगजडीत असतो. परंतु जेव्हा ही यंत्रणा सुरू होते, तेव्हा पुन्हा पुन्हा गोळीबार करण्याची सुचना दिली जात नाही. ही यंत्रणा  स्वतःच कार्य करते.  आपण त्यास ऑटोमेटिक  सिस्टम देखील म्हणू शकता. ही यंत्रणा क्षेपणास्त्र बॅटरीशी जोडलेली असते, जी सतर्कतेचा आदेश मिळाल्यानंतर हवेतील धोक्याचा मागोवा घेते आणि प्रतिहल्ला करते. 


फार खर्चीक आहे ही व्यवस्था
आयर्न डोम सिस्टम प्रणालीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्या क्षेपणास्त्रात अशी यंत्रणा आहे की जर डोमच्या क्षेपणास्त्राने शत्रूंच्या क्षेपणास्त्रांवर थेट हल्ला केली नाही तर ते जवळच 10 मीटरवर फुटतात आणि त्यामुळे शत्रूचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट होते. परंतु ही संपूर्ण यंत्रणा खूप महाग आहे. बॅटरीमध्ये 4 क्षेपणास्त्रे असतात, ज्याची किंमत 7.3 कोटी रूपये आहे.


प्रत्येक क्षेपणास्त्राची किंमत 59 लाख रुपये असते, परंतु हल्ल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रॉकेटची किंमत तब्बल 1 लाख रुपये आहे.  प्रत्येक धोका टाळण्यासाठी सिस्टम 2 क्षेपणास्त्रांचा वापर करते, म्हणजे ही यंत्रणा अचूक पण खर्चीकही आहे.