मुंबई : पाकिस्तानची बिघडलेली आर्थिक स्थिती बऱ्याचदा देश आणि जगाच्या बातम्यांचा एक भाग राहते. तेथील महागाई गगनाला भिडली आहे. तेथे 1 लिटर दुधाची किंमत तेथील पैशांत 130 ते 140 रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे तेथील एक चहाच्या कपाच्या किंमतीत आपण भारतात संपूर्ण नाश्ता करु शकतो. हे सगळं होण्याचे कारण म्हणजे पाकिस्ताची सध्याची बिघडलेली अर्थव्यवस्था.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानात भारता सारखेच 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 2000 रुपये सारख्या नोटा चलनात वापरल्या जातात, तसेच तेथे 1000 रुपये आणि 5000 रुपयांच्या देखील नोटा आहेत.


पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणेच तेथील चलनाची स्थितीही वाईट आहे. भारतीय चलनाच्या तुलनेत पाकिस्तानी चलनाचे मूल्य अर्ध्यापेक्षा कमी आहे. असे म्हणता येईल की, भारताचा रुपया पाकिस्तानपेक्षा मजबूत आहे, कारण भारताचा एक रुपया पाकिस्तानच्या 2.29 रुपयांच्या बरोबरीचा आहे. दुसरीकडे, जर डॉलरशी तुलना केली तर 1 अमेरिकन डॉलरचे मूल्य पाकिस्तानी रुपयामध्ये 168.82 रुपये आहे, तर ते भारतीय चलनात 73.72 रुपयांच्या बरोबरीचे आहे.


नोटाबंदीनंतर भारतात आणलेल्या 2000 रुपयांच्या नोटेशी तुलना करायची झाली तर त्याचे मुल्य पाकिस्तानच्या 4579.34 रुपयांच्या बरोबरीची आहे. म्हणजेच आपली 2 हजारांची रुपयांची नोट जवळजवळ पाकिस्तानच्या 5 हजार रुपयांच्या बरोबरीची आहे.


भारतीय चलनावर महात्मा गांधींप्रमाणेच पाकिस्तानी चलनावर मोहम्मद अली जिना यांचा फोटो आहे. तसेच, इतर माहिती सोबत स्टेट बँक ऑफ पाकिस्तान असे त्यावर उर्दूमध्ये लिहिलेले आहे.


भारताप्रमाणेच पाकिस्तानच्या चलनातही अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, ज्यात वॉटरमार्क, सुरक्षा धागा, अँटी स्कॅन आणि अँटी कॉपी इत्यादी आहे.