पाककडून कुलभूषण जाधव यांच्या आई-पत्नीला वीजा मंजूर
पाकिस्तानच्या तावडीत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाककडून वीजा मंजूर करण्यात आलाय.
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या तावडीत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाककडून वीजा मंजूर करण्यात आलाय.
पाकिस्तानच्या परदेश कार्यालयानं ही माहिती दिलीय. वीजा मिळाल्यानंतर ४७ वर्षीय कुलभूषण यांची त्यांची आई-पत्नी भेट घेऊ शकणार आहेत.
पाकिस्तानने १० नोव्हेंबरला मानवतेच्या आधारावर जाधव यांच्या पत्नी आणि आईला जाधव यांना भेटण्यासाठी हिरवा कंदिल दिला होता. भारताने पाकिस्तानकडे जाधव यांना पत्नीसोबत आईलाही भेटू द्यावे, अशी मागणी केली होती.
कथित गुप्तहेराच्या आरोपीखाली पाकिस्तानाती तुरुंगात कैद असलेला भारतीय नौसेनेचा माजी कमांडर कुलभूषण जाधव यांना अटक केली. तेव्हापासून ते पाकिस्तानच्या ताब्यात आहेत.