नवी दिल्ली : भूमाफिया चीनची भूक काही कमी होत नाहीये. संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटात टाकून चीन आता अनेक देशांसोबत वाद निर्माण करत आहे. भारत, म्यानमार, जपान नंतर आता चीनने रशियामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनामुळे टीकेचा लक्ष्य झालेल्या चीनला रशियाने पाठिंबा दिला होता. पण आता चीन त्याच मित्राच्या पाठीत खंजीर खूपण्याचा प्रयत्न करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशिया देखील सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. हाँगकाँगच्या मुद्द्यावर देखील रशियाने चीनचा विरोध केला नव्हता. पण आता त्याच रशियाच्या एका शहरावर चीनने दावा ठोकला आहे.


चीनने रशियातील शहर व्लादिवोस्तोकवर दावा केला आहे. हे शहर रशियाने द्वितीय अफीम युद्धात चीनला पराभूत केल्यानंतर मिळवलं होतं. चीन हे क्षेत्र तेव्हा गमावून बसला होता. दोन्ही देशांमध्ये 1860 मध्ये एक करार देखील झाला होता. पण चीन आता इतक्या वर्षानंतर पुन्हा या शहरावर आपला दावा सांगत आहे.


चीनने म्हटलं की, हे शहर आधी हैशेनवाई नावाने प्रसिद्ध होतं. ज्याला रशियाने चीनकडून हिसकावून घेतलं आहे. चीनने रशियाच्या विरोधात आता चुकीचा प्रसार सुरु केला आहे.


एका सोशल मीडिया पोस्टवरुन हा वाद सुरु झाला आहे. चीनमध्ये रशियाच्या राजदूतांकडून चीनची मायक्रो ब्लॉगिंग साईट Weibo वर व्लादिवोस्तोक शहराबाबत एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. व्हिडिओचा उद्देश व्लादिवोस्तोक शहराचा 160 वा स्थापना दिनाचा होता.  पण चीनला हे सहन झालं नाही.


चीनचा फिलीपींस, मलेशिया, इंडोनेशिया सोबत देखील वाद सुरु आहे. रशियाचं व्लादिवोस्तोक शहर हे पॅसिफिक समुद्रात त्याचा महत्त्वाचा बेस आहे. हे शहर प्रिमोर्स्की क्राय राज्याची राजधानी आहे. हे शहर चीन आणि उत्तर कोरियाच्या सीमेजवळ आहे. व्यापार आणि ऐतिहासिक रूपाने व्लादिवोस्तोक रशियासाठी महत्त्वाचं शहर आहे. रशियाचा मोठ्या प्रमाणात व्यापार याच मार्गातून होतो.