नवी दिल्ली : Zoonotic Langya Virus: कोरोनानंतर चीनमध्ये एक खतरनाक विषाणू सापडला आहे. याच्या प्रवेशाने चीन हादरुन गेला आहे. हा नवा  virus किती धोकादायक आहे आणि त्याच्यावर काय उपाय आहेत का, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या वुहानमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला. यातून जग सावरले नाही. आता चीनमध्ये आणखी एक धोकादायक विषाणू सापडला आहे. या नवीन विषाणूचे झुनोटिक लांग्या, असे नाव आहे. (Zoonotic Langya Virus) चीनमध्ये 8 ऑगस्ट रोजी झुनोटिक लांग्या विषाणूचे 35 रुग्ण मिळाले आहेत. ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतातील लोकांना हेनिपाव्हायरस लांग्या (Langya Henipavirus) या नवीन प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. चीनमधून समोर आलेला हा नवीन विषाणू किती धोकादायक आहे?


प्राण्यांपासून पसरणारे विषाणू


द ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या विषाणूला लांग्या हेनिपाव्हायरस (Langya Henipavirus) एलएव्ही असेही म्हणतात. या विषाणूच्या चाचणीसाठी न्यूक्लिक अ‍ॅसिड चाचणी पद्धत केली जाते. हा विषाणू धोकादायक ठरु शकतो. Henipavirus Langya हा विषाणू प्राण्यांपासून पसरतो. हा विषाणू मानवांना संक्रमित करु शकतो.


व्हायरसची लक्षणे कोणती? 


जेव्हा या विषाणूचा संसर्ग होतो, तेव्हा लोकांना ताप येतो, थकवा जाणवतो, खोकला लागणे, भूक न लागणे, स्नायूंमध्ये अस्वस्थता, मळमळ, डोकेदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षणे दिसतात. शेंडोंग आणि हेनान प्रांतांमध्ये लंग्या हेनिपाव्हायरस संसर्गाच्या 35 पैकी 26 रुग्णांमध्ये ताप, चिडचिड, खोकला, मळमळ, डोकेदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षणे आढळून आली. पूर्व चीनमधील ताप असलेल्या रुग्णांच्या घशातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये हे आढळून आले आहे.


प्रतिबंध हाच उपचार 


या विषाणूमुळे अद्याप कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, तो किती धोकादायक असू शकते, यावर सध्या संशोधन सुरु आहे. तूर्तास घाबरून जाण्याची गरज नाही, परंतु याचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. Henipavirus Langya व्हायरसवर आतापर्यंत कोणतीही लस तयार केलेली नाही. यावर एकच उपचार आहे, तो म्हणजे स्वत:ची काळजी घेणे आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे होय.


WHOने स्पष्ट केलेय की...


तैवानच्या सीडीसीचे उपमहासंचालक चुआंग झेन-हसियांग यांनी सांगितले की, या विषाणूचा मनुष्य-ते-मानव प्रसार होत नाही. त्याबाबत संशोधन सुरु असले तरी. त्याचवेळी, जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, लांग्या विषाणूमुळे (Langya Henipavirus) प्राणी आणि मानवांमध्ये गंभीर रोग होऊ शकतात.