अमेरिका दहशतवादी हल्ला, बळींची संख्या ५८ वर
अमेरिकेच्या लास वेगासमधल्या कसिनोत झालेल्या बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५८ वर गेली आहे. तर ५०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचंही पुढं आले आहे.
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या लास वेगासमधल्या कसिनोत झालेल्या बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५८ वर गेली आहे. तर ५०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचंही पुढं आले आहे.
हल्लेखोर हा ६४ वर्षांचा स्थानिक वृद्ध नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस येण्याआधीच या हल्लेखोरानं स्वतःला गोळी मारुन संपवले. कोणत्याही दहशवादी संघटनेशी त्याचा संबंध नसल्याचं प्राथमिक चौकशीत पुढं आले आहे.
हल्लेखोराशी संबंधीत एका महिलेशी सध्या चौकशी सुरू आहे. लास वेगासमधल्या मांडले रिसोर्ट आणि कसिनोत म्युझिक शोदरम्यान या हल्लेखोरानं बेछूट गोळीबार केला. तब्बल १० हजार प्रेक्षक या म्युझिक कॉनर्सटला हजर होते.