नवी दिल्ली : इस्लामाबादमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा यांच्यात बैठक झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी या दोघांमध्ये बैठक झाली. सूत्रांच्या माहितीनुसार दाऊद इब्राहिम आणि लष्कर-ए-तैयबा हे एकत्र दहशतवादी हल्ल्याची योजना आखत आहेत. आयएसआयला दहशतवादी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कोरोना काळात भारतात अशांतता पसरवायची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान दाऊद आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा यांच्या मदतीने दहशत पसरवण्याचा कट रचत आहे. यासाठी लष्करने दाऊद इब्राहिमशी हातमिळवणी केली आहे. रविवारी इस्लामाबादमध्ये दाऊदला त्याच्या फार्महाऊसवर पाहिलं गेल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.


सूत्रांचे म्हणणे आहे की, 'डॉन एलईटी नेत्यांना भेटण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) च्या टीमसह गेला होता.


दुसरीकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या शत्रूंना कडक संदेश दिला. त्यांनी म्हटलं की, 'देशातील सैन्य सर्व शत्रूंचा खात्मा करण्यासाठी कटिबद्ध आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त बोलताना त्यांनी हा इशारा दिला. संरक्षणमंत्री म्हणाले की, 22 वर्षापूर्वी पोखरण येथे याच दिवशी अणुबॉम्बची चाचणी घेण्यात आली होती. मला माझ्या देशवासियांना हे सांगायचे आहे की संरक्षण मंत्रालय देशातील सर्व शत्रूंचा नाश करण्यासाठी वचनबद्ध आहे. मग तो सीमेवर दिसणारा शत्रू असो वा कोरोना व्हायरससारखा अदृश्य शत्रू असो.'