प्रसिद्ध ब्रिटीश बॅन्डच्या मुख्य गायक चेस्टर बेनिंगटनची आत्महत्या
लिंकीन पार्क या प्रसिद्ध ब्रिटीश बॅन्डच्या मुख्य गायक चेस्टर बेनिंगटननं आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलंय.
लंडन : लिंकीन पार्क या प्रसिद्ध ब्रिटीश बॅन्डच्या मुख्य गायक चेस्टर बेनिंगटननं आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलंय. चेस्टर केवळ 41 वर्षांचा होता. हार्ड रॉक, हिपहॉप आणि रॅप अशा विविध प्रकारच्या स्टाईलसाठी गायक चेस्टर बेनिंगटन ओळखला जात होता.
गेल्या अनेक वर्षांपासून चेस्टर डिप्रेशनचा शिकार होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही चेस्टरनं अशाच प्रकारे स्वताहचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. अखेर लॉस एंडलसमध्ये राहत्या घरीच चेस्टरनं आत्महत्या केली.