मुंबई : जर तुम्ही सफारीवर जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहिला पाहिजे. कारण तुम्ही जरी गाडीत असाल तरी सिंह तुमच्या गाडीचं दार उघडण्याचा कसा प्रयत्न करतो हे तु्म्ही या व्हिडिओमधून पाहू शकता. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील असल्याचं बोललं जातंय. एक कुटुंब क्रूगर नॅशनल पार्कमध्ये फिरण्यासाठी येतं. अचानक सिंह त्यांच्या गाडीजवळ येतो आणि गाडीच्या डोरचा हँडल दाताने ओढून डोर उघडण्याचा प्रयत्न करतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी शेअर केला आहे. 


पाहा व्हिडिओ