लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी रविवारी माहिती दिली की, देशातील कोरोना संकटामुळे लॉकडाऊन त्वरित संपणार नाही. ब्रिटनमध्ये 1 जूनपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात येत आहे. पण लॉकडाऊन सुलभ करण्यासाठी सरकार काही योजनांवर काम करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉनसन यांनी म्हटलं की, "या आठवड्यात लॉकडाऊन संपवले जावू शकत नाही. त्याऐवजी आम्ही उपायांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पाऊलं उचलत आहोत."


बोरिस जॉनसन म्हणाले की, जे घरातून काम करू शकत नाहीत त्यांना सोमवारपासून कार्यालयात जाऊ दिले जाईल. ते म्हणाले की, बुधवारपासून लोकं व्यायाम आणि खेळ यासारख्या उपक्रमांसाठी बाहेर जाऊ शकतील, परंतु त्यासाठी सामाजिक अंतराचे पालन करावे लागेल.


'तुम्ही तुमच्या स्थानिक उद्यानात उन्हात बसू शकता, तुम्ही गाडी चालवू शकता आणि इतर कोणत्याही ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही खेळ खेळू शकता पण फक्त तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह.'


ब्रिटनच्या पंतप्रधानांनी पाच स्तरीय अ‍लर्ट सिस्टम ठेवली आहे. ज्याचा उपयोग वैज्ञानिक डेटाद्वारे व्हायरसच्या प्रसाराच्या प्रमाणावर नजर ठेवण्यासाठी सरकार करणार आहे.


आपल्या अलर्ट सिस्टमच्या 'लेव्हल' विषयी बोलताना बोरिस जॉनसन म्हणाले की, 'लेव्हल 1 चा अर्थ असा आहे की हा आजार ब्रिटनमध्ये अस्तित्त्वात नाही. पातळी 5 सर्वात गंभीर आहे. लॉकडाऊन दरम्यान आम्ही पातळी 4 मध्ये आलो आहोत आणि सर्वांचे धन्यवाद. कारण आता आपण पातळी 3 मध्ये प्रवेश करण्याच्या स्थितीत आहोत.'