नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी सध्या लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत देखील होत आहे. पण याचे काही साईड इफेक्ट देखील आहेत. संयुक्त राष्ट्राने (UN)एका अशाच साईड इफेक्टकडे इशारा केला आहे. UN ला वाटतं की, लॉकडाऊनच्या काळात जन्मदर मोठ्य़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. भारत आणि चीनमध्ये सर्वाधिक मुलं जन्माला येतील. आधीच खूप जास्त लोकसंख्या असलेल्या या २ देशांवर आता आणखी भर पडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूनिसेफच्या एका रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, 11 मार्च ते 16 डिसेंबर दरम्यान या नऊ महिन्यांमध्ये जगभरात 116 मिलियन मुलं जन्माला येतील. पण कोरोनाच्या काळात गरोदर होणाऱ्या या आईंच्या आरोग्याविषयी देखील चिंता व्यक्त केली जात आहे. भारताबद्दल बोलायचं झालं तर डिंसेबरपर्यंत भारतात २ कोटी मुलं जन्माला येण्याची शक्यता आहे. ही संख्या जगात सर्वाधिक आहे.


भारतानंतर चीनचा याबाबत दुसरा क्रमांक लागतो. यूएनच्या अंदाजानुसार चीनमध्ये 1.35 कोटी मुलं जन्माला येतील. तर पाकिस्तानमध्ये 50 लाख मुलं जन्माला येतील. नायजेरियामध्ये 60.4 लाख, इंडोनेशियामध्ये 40 लाख मुलांचा जन्म होण्याची शक्यता आहे. अमेरिका या जन्मदराच्या बाबतीत सहाव्या स्थानावर आहे. येथे 30 लाख मुलांचा जन्म होण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कमध्ये तर यासाठी व्यवस्था देखील सुरु झाली आहे. कारण गरोदर महिला आतापासूनच रुग्णालयात मुलांना जन्म देण्याबाबत चिंतेत आहेत.