लंडन : म्हणतात ना, कोणाचे भाग्य कधी, कुठे आणि कसे बदलेल, हे सांगता येत नाही. असेच एक प्रकरण लंडनमध्ये (London) समोर आले आहे. जिथे एका व्यक्तीने रस्त्यावरील चोर बाजारातून जुना तुटलेला एक चमचा विकत घेतला होता आणि आता 12 हजार पटीच्या भावात विकला आहे.


90 पैशांत विकत घेतला तुटलेला चमचा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द सन'च्या वृत्तानुसार, एका व्यक्तीची रस्त्यावरुन जाताना चोरबाजारातील एका चमच्यावर नजर गेली. मात्र, हा चमचा तुटलेला होता. परंतु त्यात त्यांना लक्षात आले की हा चमचा काहीतरी खास आहे. म्हणूनच त्याने हा जुना चमचा 90 पैशांना विकत घेतला. यानंतर त्या व्यक्तीने या 5 इंचाच्या चमच्याची तपासणी केली, ज्यात ती चांदीची असल्याचे उघड झाले. त्याची रचना 13 व्या शतकातील रोमन युरोपियन शैलीची आहे. त्या माणसाला खात्री पटली की त्याला जॅकपॉट लागला आहे.


2 लाख रुपयांना लिलावात विकले


यानंतर, त्या व्यक्तीने चमच्याची सध्याची किंमतीचा अंदाज लावला, तो सुमारे 52 हजार रुपये निघाला. त्याने या चमच्याची किती किंमत होते, यासाठी ऑनलाईन चाचपणी सुरु केली. त्याने तो ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लिलावासाठी ठेवला. दरम्यान, हळूहळू त्याची बोली लिलावात वाढत गेली. या चमच्याच्या बदल्यात त्याला लाखो रुपये देऊ करण्यात आले. पण शेवटी या चमच्याची बोली 1 लाख 97 हजार रुपयांना अंतिम झाली. कर आणि अतिरिक्त शुल्क जोडून, ​​त्याची किंमत 2 लाख पार केली आहे. जी त्याने खरेदी केलेल्या रकमेपेक्षा 12 हजार पट जास्त होती.


 कार बूट मार्केटमधून खरेदी केला चमचा


चमच्या खरेदी केल्या व्यक्तीने आपली ओळख लपवली आहे. पण त्याची कथा लिलाव करणाऱ्या  कंपनीने शेअर केली. सांगितले जात आहे की, ती व्यक्ती कार बूट बाजारात जायची. तिथे त्याला हा चमचा एका तळघराजवळ दिसला. त्याने चमचा फक्त 90  पैशात विकत घेतला. चमचा घेतल्यानंतर, त्या व्यक्तीने सॉमरसेटच्या (Somerset) चांदीचे तज्ज्ञ लॉरेन्स   ऑक्शनर्स (Lawrences Auctioneers) यांच्याशी संपर्क साधला. त्याने त्या व्यक्तीला सांगितले की हा चमचा खूप मौल्यवान आहे.